सरपंच परिषदेच्या दिनदर्शिकेचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते प्रकाशन
सरपंच परिषदेच्या जिल्हा समन्वयक सौ वनिता सुरवसे यांच्या कार्याचे केले कौतुक
सोलापूर / अक्कलकोट ( प्रतिनिधी ) : दिनांक 13 जानेवारी रोजी पुणे येथे सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या सोलापूर जिल्ह्याच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि सोलापूर जिल्ह्याच्या समन्वयक सौ वनिता सुरवसे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रच्या सोलापूर जिल्हा पदाधिकारी यांच्या वतीने सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड विकास जाधव, जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख, जिल्हा समन्वयक वनिताताई सुरवसे,अमोल दुरंदे, जिल्हाध्यक्ष कविताताई घोडके व इतर पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून सरपंच दिनदर्शिका तयार केली आहे, सरपंच परिषदेचे दिनदर्शिका प्रकाशित करण्याचे हे पाचवे वर्ष आहे,प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे व प्रदेश उपाध्यक्ष ॲड विकास जाधव यांनी सरपंच परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात सर्व ग्रामपंचायत व गोरगरीब यांच्या घरी दिनदर्शिका पोचवण्याचे काम होत आहे.
सरपंच परिषदेमुळे सरपंचांना व ग्रामपंचायत सदस्यांना न्याय मिळत आहे. सरपंच परिषद ग्रामीण महाराष्ट्रात क्रांती घडवेल, या दिनदर्शिकेमध्ये एकदम फोटो सहित सर्व माहिती प्रसिद्ध केलेली आहे. अति उत्तम दिनदर्शिका छापल्याबद्दल श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी सरपंच परिषद आणि सरपंच वनिता सुरवसे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. सरपंच पदावर रुजू झाल्यापासून आत्तापर्यंतची सर्व माहिती त्यांनी घेतली, गावामध्ये चिरंजीव कामे होण्यासाठी सर्व सरपंच आणि प्रयत्न करायला हवे, गरीबी मुक्त गाव करण्यासाठी सर्व सरपंचांनी झटायला पाहिजे, आताच्या युगात सरपंच गावापुरता मर्यादित नसून सरपंच दिल्लीपर्यंत सुद्धा जाऊ शकतो हे आपण आपल्या कार्यातून दाखवून दिलेले आहे, तुमच्या हातून असेच समाज हिताचे काम घडत राहो अशा शुभेच्छा देऊन सरपंच वनिता सुरवसे यांच अभिनंदन सुद्धा केले. सरपंच सौ सुरवसे यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा मानाची शाल,श्रीफळ, पुष्पगुछ देऊन सन्मान केला व त्यांच्याकडून आशीर्वाद घेतले.
या प्रकाशन सोहळ्यास सरपंच परिषदेच्या जिल्हा समन्वयक सौ वनिता सुरवसे यांच्या सह उद्योगपती सुधाकर सुरवसे, सुधीर गायकवाड, नंदकुमार बामणे सर, डॉक्टर सुनील होनराव, निलेश कडाव, मधुकर सुरवसे, साक्षी पाटील यांच्यासह इतर मान्यावर उपस्तिथ होते.