2 C
New York
Saturday, December 7, 2024

Buy now

spot_img

सलीम मासुलदार यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित..!

सलीम मासुलदार यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित..!

अक्कलकोट: प्रतिनिधी

अक्कलकोट तालुक्यातील कलप्पावाडी येथील रहिवासी, सध्या पासपोली पवई मुंबई महानगरपालिका येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सलीम मासुलदार यांना शैक्षिणक २०२३-२४ वर्षा मध्ये शैक्षणिक,सामाजिक सांस्कृतिक साहत्यिक , क्षेत्रात उल्लखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम या नामांकित संस्थेच्या वतीने ‘राज्यस्तरीय आदर्श गुरुजन’ पुरस्कार फेटा बांधून ट्रॉपीसह सन्मान पत्र प्रदान करुन गौरविण्यात आले.
यावेळी फोरम चे राष्ट्रीय डायरेक्टर गोरख देवरे,नॉर्थ महाराष्ट्र डायरेक्टर प्रिया पाटील, ऑडिशनल स्टेट डायरेक्टर प्रा.प्रमोद पाटील.तसेच गुरुवर्य बाळाराम पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज , दारावे,नेरूळ नवी मुंबई ,तथा विद्यावर्धिनी संस्थेचे अध्यक्ष सुनील बाळाराम पाटील.मुख्याध्यापक अविनाश पवार,मनोज नाक्ती हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळेस राज्यातील विविध शाळेतील शेकडो आदर्श शिक्षक व मुंबई महानगरपालिका येथील मुख्याध्यापिका वृषाली देसाई, मुख्याध्यापक गणेश सलवदे,सिद्धार्थ मगर, रामराव पाटील,अर्जुन सलवदे,हणमंत कराजनगी, रवी यादव, वर्षा पाटील,गुलाब दास,कमल गायकवाड आदी उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img