कलबुर्गी जिल्ह्यामध्ये झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विठंबनेतील आरोपींना फाशीच्या शिक्षा द्यावे-अविनाश मडिखांबे
अक्कलकोट/प्रतिनिधी
कर्नाटक राज्यातील कलबुर्गी लगत असलेल्या कोटनूर(डि) या गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास
मध्यरात्री काही समाज कंटकाने विटंबना केली आहे.त्या घटनेचा आम्ही रिपब्लिकन पक्ष(आठवले गट)च्या वतीने तीव्र निषेध करतो आणि अटकेत असलेल्या सर्व आरोपीना कर्नाटक सरकारने फाशीच्या शिक्षा द्यावे. अशी मागणी रिपाइं तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी केली आहे.
अक्कलकोटचे तहसिलदार बाळासाहेब सिरसाठ यांच्याकडे निवेदन देउन सदर घटनेत अटक केलेल्या आरोपीस फाशीची शिक्षा देण्या साठी कर्नाटक सरकारला कळवावे.अशी या निवेदनात म्हटले आहे. जेणे करुन या पुढे अशा कुठल्याही महापुरुषांच्या विटंबना कोणी करु नये.अशा समाज कंटकांना फाशीचीच शिक्षा देण्यात यावे तरच कायद्याच दरारा राहील.या मागणी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या मार्फत कर्नाटक गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांना पाठवण्यास सांगीतले आहे. जर यापुढे आरोपींना शिक्षा देण्यास हलगर्जीपणा केल्यास देशभरात रिपाइंच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.अशा इशारा यावेळी रिपाइंच्या वतीने केली आहे. याप्रसंगी रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी,तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे,शहर अध्यक्ष अजय मुकणार यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना या घटनेचा निषेध करुन आरोपीस फाशी देण्याचे मागणी केली आहे. यावेळी रिपाइं ता अध्यक्ष अविनाश मडिखांबे,जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी,सरचिटणीस विजय पोतेनवरु,ता कार्याध्यक्ष राजेभाई बोरगाव,सैपन शेख,सूरज सोनके,विलास गायकवाड,शुभम मडिखांबे,राजु भगळे,तम्मा दसाडे,उत्तम गायकवाड सचिन बनसोडे, गोरखनाथ धोडमनी,मलकण्णा सोनकांबळे,सरपंच रमेश धोडमनी, बबलाद सरपंच बाबु निरगुडे, उमेश गायकवाड, वसंत आरेनवरु सर, बसु बबलाद, निंगप्पा निंबाळकर,व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते.