गोगांव येथील ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
सरपंच वनिता सुरवसे यांच्याहस्ते दिव्यांग व्यक्तींना चेक वाटप
अक्कलकोट ( प्रतिनीधी ) प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत गोगांव येथे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, सदस्य प्रदीप जगताप हे प्रमुख उपस्थीतीत होते यावेळी प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सदस्य ललिता कलशेट्टी व पोलीस पाटील चंद्रकला गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले व ध्वज कट्टा पूजा माजी सैनिक पंडित मूळजे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ध्वजारोहन सरपंच सौ वनिता मधुकर सुरवसे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
जिल्हा परिषद शाळा गोगांव येथे माजी तंटा मुक्त अध्यक्ष कल्याणराव बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला,यावेळी प्रमुख उपस्थिती सरपंच वनिता सुरवसे, उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर जगताप , आरोग्य सेविका अंबिका वळसंग, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण बिराजदार, ललिता कलशेट्टी, मुख्याध्यापक दयानंद चोळे, उपस्थित होते यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी प्रतिमा पूजन शरणपा कोकणे व कलप्पा बनसोडे, मेजर बाबुलाल नदाफ यांच्या हस्ते करण्यात आले ध्वज कट्टा पूजा शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शोभा मुळजे यांनी केले ध्वजरोहन ग्रामपंचायत जेष्ठ सदस्य प्रदीप जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले यावेळी सरपंच वनिता सुरवसे व ग्रामपंचायत आणि पोलीस पाटील चंद्रकला गायकवाड, सिद्धार्थ सोशल फाउंडेशन, यांच्यावतीने खाऊ वाटप करण्यात आले यावेळी नरसिंह कटकधोड यांच्या स्मरणार्थ पहीली ते सातवी विद्यार्थींना वही, पेन, खोडरबर, प्याड, सिस्पेंसेल, साहित्य सरपंच वनिता सुरवसे, उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यासह सर्व मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी सदस्य नामदेव बनसोडे, दत्तात्रय गायकवाड, सुर्यकांत जिरगे, आकाश गायकवाड, अंगणवाडी सेविका तेजाबाई गुरव, भाग्यश्री सोनकवडे, पुंडलिक वाघमारे, महादेव चव्हाण,ज्योती आलूरे यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन शंकर कारभारी यांनी केले