19.1 C
New York
Wednesday, September 18, 2024

Buy now

spot_img

वागदरी येथे मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याबद्द्ल विजयी जल्लोष

वागदरी येथे मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याबद्द्ल विजयी जल्लोष

अक्कलकोट ( प्रतिनीधी )वागदरी येथे मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याबद्द्ल विजयी जल्लोष साजरा करण्यात आला.या प्रसंगी श्री.परमेश्वर मंदिर पासून ते शिवबसव चौक एस. टी.स्टँड पर्यंत हलगीच्या निनादा मध्ये विजयी मिरवणूक काढण्यात आली.व स्टँड समोरील छ. शिवाजी महाराज,महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस हार घालून या ठिकाणी छोटेखानी सभा घेण्यात आली.या वेळेला श्री.मनोज जरंगे पाटील यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.या प्रसंगी गोगाव गावचे माझी सरपंच.श्री.प्रदीप जगताप,श्री.शेळके प्रशाला वागदरीचे चेअरमन श्री.बसवराज शेळके, युवक तालुका काँगेस अध्यक्ष श्री.शिवराज पोमजी, गावचे उपसरपंच श्री.पंकज सुतार, भाजपचे ज्येष्ठ नेते श्री.श्रीशैल ठोंबरे, मराठा समाजाचे युवा व्यक्तिमत्व श्री.सुनील सावंत,भाजपा नेते श्री संतोष पोमाजी,श्री.प्रकाश पोमाजी ,मराठा समाज ट्रस्ट चे अध्यक्ष श्री शिवाजी यशवंत सावंत,श्री.महादेव सोनकवडे मराठा तंटामुक्त उपाध्यक्ष श्री.बाबुराव मोरे,श्री.रमेश सावंत, श्री.एकनाथ माने,सोने व्यापारी कदम यांच्यासह असंख्य समाज बांधव व इतर समाज बांधव,युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी मराठा आरक्षणामुळे आपल्या समाज बांधवांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होणार असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.मराठा योद्धा मनोज पाटील यांनी आपल्या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अखंड लढा उभा केला,तो लढा येसस्वी केला त्या बद्दल समाज बांधवांनी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.तसेच मराठा समाज बांधवांची आरक्षणाची मागणी सरकारने मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे,उप मुख्य मंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या सह विद्यमान सरकारचे अभिनंदन करण्यात आले.अश्या प्रकारे वागदरी मध्ये
मराठा आरक्षण मिळाल्या बद्दल समाज बांधव कडून मोठया प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.महादेव सोनकवडे यांनी केले.

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img