ऑल इंडिया संपादक संघाचा २४ फेब्रुवारी रोजी पहिला वर्धापन दिन
देशभर विविध उपक्रमांचे आयोजन ; कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने मिस् क्लॉर्क येथे कार्यक्रमाचे आयोजन
कोल्हापूर/प्रतिनिधी : ऑल इंडिया संपादक संघाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा ऑल इंडिया संपादक संघाच्या वतीने ऐतिहासिक मिस् क्लार्क होस्टेल येथे सायं ४. वाजता जिल्ह्यातील विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संपादक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कांबळे (लिंगनूरकर) यांनी दिली आहे. देशात प्रथमच स्थापण करण्यात आलेल्या ऑल इंडिया संपादक संघाचा पहिला वर्धापन दिन आहे. २४ फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभर संपादक संघाच्या माध्यमातून ऑल इंडिया संपादक संघ साजरा होत असून कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले
संस्थापक अध्यक्ष करण बौध्द यांनी देशातील एस.एसी.एस.टी., ओबीसी संपादकांना एकत्रित करून देशातील पहिल्या ऑल इंडिया संपादक संघाची स्थापना केली. या संघाच्या माध्यमातून देशातील सर्व संपादक एकत्र जोडले गेले आहेत.या संघटनेचे उत्तरप्रदेश, बिहार, छत्तीसगड, राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आदि देशातील जवळपास सर्वच राज्यात संघटनउ भे राहिले आहे. २४ फेब्रुवारी २०२३ ला संघाची स्थापना करण्यात आली आहे. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असून पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष स्वप्निल कांबळे व कार्यकारणीने जाहीर केला आहे.त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने ऐतिहासिक मिस् क्लार्क होस्टेल येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रकाश कांबळे (लिंगनूरकर) व सचिव दिपक कांबळे यांनी केले आहे.