तीन ते चार दिवसात दुधनीकरांना पाण्याचे सोय करणार- आतीश वाळुंज
अक्कलकोट(प्रतिनिधी) दि-अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील नगर परिषदेच्या वतीने येत्या तीन ते चार दिवसात नागरिकांसाठी पिण्याचे पाण्याची सोय केली जाईल असे आश्वासन मुख्याधिकारी आतील वाळूंज यांनी दिली आहे.
दुधनी नगर परिषदेत रयतेचे राजा,महाराष्ट्राचे कुलदैवत शिवाजी महाराज यांच्या जयंती करुन मुख्याधिकारी दालनात रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांच्या सहीत ग़्रामस्थ बसले असता पाण्याचे चर्चा चालु असतांना एका प्रश्नाला उत्तर देतांना म्हणाले की,गावात एकूण सहा बोअरवेल मारले असून लगेच सोय करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
याप्रसंगी मुख्याधिकारी आतील वाळूंज,रिपाइं (आठवले गट) चे जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी,शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी, पत्रकार तथा रिपाइं प्रसिध्दी प्रमुख निंगराज निंबाळ, रिपाइं मुस्लिम आघाडी शहर अध्यक्ष महेदीमिंया जिडगे,मुकादम मौलप्पा गायकवाड,सेवा निवृत्त कर्मचारी गुंडप्पा परमशेट्टी,पाटील सह इतर कर्मचारी आणी नागरीक उपस्थित होते.
लवकरात लवकर पाण्याचे नियोजन करण्यात यावे नागरिक पाण्यासाठी वणवण वण फिरता येते हे बंद झाले पाहीजे याची काळजी घ्यावी. असे सैदप्पा झळकी यांनी मागणी केली.