मैत्री ग्रुपचे सामाजिक कार्य देशसेवेसाठी प्रेरणादायी आणि प्रशंसनीय : अजित भाऊ गायकवाड
सोलापूर l प्रतिनिधी
येथील मैत्री ग्रुपचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असुन देशसेवेसाठी रक्तदान शिबिर भरवून मैत्री ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे. त्यांचें हे काम निश्चितच देशसेवेसाठी प्रेरणादायी आणि प्रशंसनीय असेच आहे, असे गौरोद्गार येथील युवकांचे प्रेरणास्थान आणि आयकॉन असलेले बॉबी ग्रुपचे संस्थापक आणि नगरसेवक अजित भाऊ गायकवाड यांनी काढले
येथील मैत्री ग्रुपच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर नामविस्तार दिन आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजीत करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराचे उद्घाटन करतांना ते बोलत होते, यावेळी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा नेते सुशील सरवदे स्वाभिमानी आर जी कंपनीचे अध्यक्ष आणि युवा नेते पिंटू ढावरे, वरिष्ठ पत्रकार आणि दैनिक प्रीतिसंगमचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महेश गायकवाड , युवा नेते विश्वदिप मालक बनसोडे व सोनू बॉस दोड्यानूर, ब्लू हार्ट सामाजिक संस्थेचे भैय्या भय्या कांबळे, भिममुद्रा सामाजिक संस्थेचे संस्थापक सुजित अवघडे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना युवकांचे प्रेरणास्थान आणि आयकॉन अजित भाऊ गायकवाड यांनी मैत्री ग्रुप च्या पाठीशी असुन आपण कायम सहकार्य करत राहू असे जाहिर केले.
मैत्री ग्रुप च्या आज घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबीराचे नियोजन येथील मल्लिकार्जुन ब्लड बँकेने केले होतें या रक्तदान शिबीरात जवळपास 65 रक्तदात्यानी रक्तदान करून मैत्री ग्रुप च्यासोबत सदैव असल्याचे दाखवून दिले मैत्री ग्रुप ही सामाजिक संघटना असून विश्र्वास आणि निष्ठा हे या संस्थेचे ब्रीद वाक्य आहे.