0.2 C
New York
Sunday, March 9, 2025

Buy now

spot_img
spot_img

बिईंग सक्सेसफूल आंत्रेप्रेन्यूअर नियतकालिक नवोदित उद्योजकांनी आवर्जून वाचावे – मिलिंद कांबळे

बिईंग सक्सेसफूल आंत्रेप्रेन्यूअर नियतकालिकाचे प्रकाशनडिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळेंच्या हस्ते संपन्न

बिईंग सक्सेसफूल आंत्रेप्रेन्यूअर नियतकालिक नवोदित उद्योजकांनी आवर्जून वाचावे
– मिलिंद कांबळे

मुंबई- बिईंग सक्सेसफूल आंत्रेप्रेन्यूअर या संस्थेतर्फे शनिवारी चेंबूर येथे यशस्वी उद्योजकांना गौरविण्यात आले. यावेळी डिक्की अर्थात दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे संस्थापक अध्यक्ष व उद्योजक पद्मश्री मिलिंद कांबळे, बिईंग सक्सेसफूल आंत्रेप्रेन्यूअरचे सर्वेसर्वा अरुण धनेश्वर, चेतना कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मधुमिता पाटील, चेतना आर. के इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट रिसर्चच्या संचालिका डॉ नंदिता मिश्रा, सिने कलाकार साहिला छड्डा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी बिईंग सक्सेसफूल आंत्रेप्रेन्यूअर या नियतकालिकाचे प्रकाशन मिलिंद कांबळे आणि अन्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच 13 यशस्वी उद्योजकांना पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात देखील आले. यामध्ये तन्वी इंजीनियरिंग कॉर्पोरेशनचे सुनील शिंदे, बिझ क्राफ्ट सोल्यूशन्स प्रा. लिचे संतोष कांबळे, सूपर्ब ग्रुपचे सुगात वाघमारे, सर्वेश एक्सप्रेस प्रा. लिचे संजय परब आणि विद्या परब, अन्नपूर्णा पर्सच्या उज्वला कांबळे, इलेक्ट्रोफाइन रिसायकलिंगच्या वैशाली स्वरूप, झिव्हट्रिक्स कॉर्पोरेट सर्विसेस प्रा.लिचे दिपेश मढकर, क्लेंझो एक्सप्रेस लॉण्ड्रीचे निलेश भोईर व प्राची भोईर, नाईस स्टील इंडियाचे खुशाल लाहोटी, मेटा क्राफ्ट इंडस्ट्रीजचे मिलिंद वायदंडे आणि निलेश वायदंडे, आरएनआर स्टोअरचे यश राठोर, युक्ती मिडिया कन्सल्टन्सीचे प्रमोद सावंत व अर्चना सोंडे आदी उद्योजकांचा या सत्कारमूर्ती मध्ये समावेश होता.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्मश्री मिलिद कांबळे म्हणाले की, ‘’सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योजक हा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया आहे. हेच क्षेत्र मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करते. भारताच्या जीडीपी मध्ये देखील मोठ्ठे योगदान देते. आजच्या काळात कधी नव्हे ते माहिती तंत्रज्ञानाचे जाळे विस्तारलेले आहे. मोबाईल हे निव्वळ संवादाचे साधन राहिले नसून तुमचे आधुनिक शस्त्र बनले आहे. कृत्रिम प्रज्ञा वापरुन निमिषार्धात पाहिजे ती माहिती उपलब्ध होऊ लागली आहे. सभोवताली रोजगाराच्या उदंड संधी उपलब्ध असताना जर कोणी बेरोजगार असेल तर तो स्वेच्छेने बेरोजगार आहे असे मी मानतो’’. यावेळी त्यांनी बिईंग सक्सेसफूल आंत्रेप्रेन्यूअर या नियतकालिकाचे प्रकाशन केल्याबद्दल अरुण धनेश्वर यांना शुभेच्छा दिल्या.

नवउद्योजकांच्या मनात उद्योग सुरू करताना अनेक प्रश्न असतात. हे प्रश्न त्यांना कोणत्याही पुस्तकातून मिळण्याची शक्यता कमी असते. मात्र अनुभवाच्या शाळेतून तावून सुलाखून निघालेले उद्योजक या प्रश्नांची उत्तरे जाणतात. त्यांचा अनुभव नवउद्योजकांना दीपस्तंभ ठरावा या हेतूने बिईंग सक्सेसफूल आंत्रेप्रेन्यूअर या नियतकालिकाची निर्मिती केल्याचे अरुण धनेश्वर यांनी म्हटले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध वृत्तनिवेदक मिलिंद भागवत यांनी केले तर आभार प्रदर्शन चेतना महाविद्यालयाचे प्राध्यापक संदीप नेमळेकर यांनी केले.

- Advertisement -spot_img
spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img