गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या वाढदिवसानिमित गोगांव सरपंच वनिता सुरवसे यांनी केले सत्कार
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) : गोगावच्या सरपंच सौ वनिताताई सुरवसे यांनी अक्कलकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री सचिन खुडे यांची अक्कलकोट पंचायत समितीमध्ये भेट घेऊन त्यांना, केक, पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
खुडे यांच्या लग्नाचा वाढदिवस आणि त्यांचा वाढदिवस एकाच दिवशी असल्याने त्यात अजून आनंदाची भर पडली, अक्कलकोट पंचायत समितीमध्ये रुजू झाल्यापासून त्यांचा कामाचा सपाटा, रोजची उपस्थिती, सर्व सरपंचांच्या समस्येचे निराकरण, अशा सर्व जबाबदाऱ्या अगदी उत्तमरीत्या पार पाडत आहेत, त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील सर्व सरपंचांचे त्यांच्या वरती असलेले प्रेम वाढलेले आहे, त्यामुळेच अक्कलकोट मध्ये खास वाढदिवसाच्या औचित्य साधून सकाळपासून शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर होत होता. त्यांचे भावी आयुष्य सुखाचे समाधानाचं भरभराटीचे जावो, त्यांच्याकडून अशाच चांगल्या प्रकारे अक्कलकोटकरांची सेवा घडो,एकामेकांच्या प्रेम आणि विश्वासाने बनलेले तुमचे पती पत्नीचे हे नाते कायम सोबत राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना. अशा गोड शुभेच्छा सरपंच वनिता सुरवसे यांनी दिल्या.
यावेळी उद्योगपती सुधाकर सुरवसे, अक्कलकोट तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व इतर अधिकारी उपस्तिथ होते.