16.9 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

हन्नूर केसरी कल्लप्पा पुजारी यांची बैल जोडीचे विजेतेपद

हन्नूर केसरी कल्लप्पा पुजारी यांची बैल जोडीचे विजेतेपद

बैलगाडा शर्यत चे पुरस्कार थाटात संपन्न

अक्कलकोट प्रतिनिधी :- गौतम बाळशंकर

हन्नुर केसरी बैलगाडा शर्यत पर्व दुसरेचे विजेतेपद हन्नुर येथील शेतकरी , कल्लाप्पा पुजारी यांची बैल जोडी 1.25000 रूपये चषक चे प्रथम पारितोषिक मिळवत विजेतेपद पटकावले.हा पुरस्कार ज्येष्ठ नेते सिद्धेश्वर कल्याणशेट्टी सर यांच्या हस्ते देण्यात आले. दुतीय क्रमांक 51.000 रूपये व चषक तिपण्णा खांडेकर यांच्या बैल जोडीने पटकावला तृतीय क्रमांक 21000 रूपये चषक संतोष घोडके यांच्या बैल जोडी ने पटकाविला. प्रमुख उपस्थिती आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांचे सुपुत्र, शुभम कल्याणशेट्टी व अवनीश कल्याणशेट्टी उपस्थित होते. ही बैलगाड्या शर्यत सागर दादा कल्याणशेट्टी मित्र परिवार , यांच्या वतीने ठेवण्यात आले होते.हन्नुर चे उपसरपंच सागर दादा कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा मोठ्या उत्साहाने संपन्न झाली.तब्बल या स्पर्धेसाठी 90 बैल जोड्यांची ऐतिहासिक बैल गाडा शर्यत दोन दिवस चालली. ही शर्यत यशस्वी होण्यासाठी राम पारतनाळे, अर्जुन जळकोटे, पत्रकार ग्राम पंचायत सदस्य गौतम बाळशंकर, भीम व्हनमाने, घुडुभाई जमादार, संजय पाटील, अमसिध्द पुजारी, धोडाप्पा रोट्टे, विश्वनाथ पारतनाळे, वैजनाथ कोरे, पिंटू भरमशेट्टी, शरण बंदिछोडे, लक्ष्मण पुजारी, भैया कोरे या शर्यतीचे निवेदक नेताजी पांढरे, परशुराम पुटगे यांनी केले आभार संयोजक उपसरपंच सागर दादा कल्याणशेट्टी यांनी मानले.

- Advertisement -spot_img

Related Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles