1.3 C
New York
Monday, January 13, 2025

Buy now

spot_img
spot_img

शैक्षणिक पालकत्व घेतलेल्या दहा मुलींना शैक्षणिक साहित्याची वाटप-कमलाकर सोनकांबळे

शैक्षणिक पालकत्व घेतलेल्या दहा मुलींना शैक्षणिक साहित्याची वाटप-कमलाकर सोनकांबळे

अक्कलकोट, ( प्रतिनिधी )
जीवनामध्ये यशस्वी बनायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही.या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जपत गरीब व गरजू दहा मुलींना दत्तक घेऊन वर्षभराचे शालेय साहित्याचे वाटप हे जाधवर (धस मॅडम) परिवाराचे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कमलाकर सोनकांबळे यांनी केले.
अक्कलकोट येथील जाधवर(धस मॅडम)यांच्या निवासस्थानी दत्तक घेतलेल्या दहा मुलींना एकत्र बोलाऊन विविध मान्यवराच्या हस्ते सोमवार दि.१२ रोजी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
बोलतांना जय भाऊ पारखे म्हणाले की,आर्थिक परिस्थिती अभावी अनेक मुलांना शिक्षण अर्ध्यावर सोडून द्यावे लागते.त्यामुळे अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जाधवर धस परिवाराने यंदाही एक दप्तर मोलाचे उपक्रम हाती घेतला आहे.यामध्ये याही वर्षी दहा मुलींचे शैक्षणिक पालकत्व घेत संपूर्ण वर्षभरातील शैक्षणिक दप्तर देऊन जाधवर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. असे म्हणाले
रिंकु अनंतराव जाधवर (धस मॅडम) म्हणाल्या की,
यामधून स्वहित,समाजहित .आणि देश हित यासाठी मी काम करत राहणार आहे. हा उपक्रम मी यापुढेही असाच चालू ठेवणार असल्याचे म्हणाल्या.
यावेळी कमलाकर सोनकांबळे, जयभाऊ पारखे, राजेश जगताप,नवनाथ धस,श्याम बाबर लक्ष्मण कोळी,लक्ष्मीकांत सुतार,विश्वनाथ जयभीम आरेनकेरी आदी उपस्थित होते.

- Advertisement -spot_img
spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img