23.3 C
New York
Wednesday, July 24, 2024

Buy now

spot_img

बार्टी तर्फे संविधान दिंडीच्या माध्यमातून महाराष्ट्राभर संविधानाचा जागर

बार्टी तर्फे संविधान दिंडीच्या माध्यमातून महाराष्ट्राभर संविधानाचा जागर

 

सोलापूर ( प्रतिनीधी ) सचिव सुमंतजी भांगे ( सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन ) यांच्या मुख्य संकल्पनेतुन व आयुक्त प्रशांतजी नारनवरे (समाज कल्याण विभाग) व महासंचालक सुनीलजी वारे (बार्टी) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी,पुणे यांचेमार्फत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर यावर्षी ही “संविधान दिंडी” चे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील आराध्य दैवत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान आषाढी वारीस शनिवारपासून सुरुवात होत आहे. देहू आळंदीत राज्याच्या कानाकोपन्यातून दिंड्या दाखल होत आहेत. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा शनिवारी दुपारी दोन वाजता पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या अनुषंगाने बार्टीचा “संविधान रथ” ही सज्ज झाले आहे. आषाढी वारी पालखी सोहळ्यात यंदा वारकऱ्यांचा – प्रचंड उत्साह दिसून येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून देहू- आळंदी नगरीतील वातावरण भक्तिमय झाले आहे. शनिवारी तुकोबारायांचा पालखी सोहळा असल्याने शुक्रवारी सायंकाळी दिंडेकरी, फडकरी, सेवेकरी देहू नगरीत माउलीच्या सोहळ्यासाठी सजली आहे.

देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवारी प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी राज्यभरातून दिंड्या देहू येथे दाखल होत आहेत. देहूमध्ये भक्तांचा मेळा भरल्याचे चित्र दिसत आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायी वारी पालखीचे रविवारी सायंकाळी चार वाजता आळंदीतून प्रस्थान ठेवणार आहे. राज्यभरातून वारकऱ्यांच्या दिड्या आळंदीत दाखल होऊ लागल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी नगर परिषद प्रशासन, पोलिस प्रशासन व आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे.

बार्टीकडून पालखी सोहळ्यात संविधान दिंडीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते ‘बार्टी’कडून पालखी सोहळ्यात संविधानविषयक प्रबोधन करण्यासाठी “संविधान रथ” सजविण्यात येते सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग महाराष्ट्र शासन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान दिंडीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.

वारकरी बांधवांना भारतीय संविधानाची माहिती व्हावी, आपले अधिकार, कर्तव्याची जाणीव व्हावी तसेच संतांच्या समतावादी विचारांचा प्रसार व्हावा हा या संविधान दिंडीचा हेतू आहे. भारतीय संविधानाबद्दल तीन प्रश्न विचारून विजेत्यांना भारतीय संविधानाची प्रत, संविधान प्रास्ताविका भेट देऊन सन्मानित करण्यात येत आहे. वारकरी बांधवांना भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाटप करून त्यांना भारतीय संविधानाबद्दल आपल्या मूलभूत अधिकार व कर्तव्याची माहिती देण्यात येत आहे.

वारकरी बांधव व नागरिकांना संविधानाच्या प्रास्ताविकाचे व बार्टी घडी पत्रिकेचे वाटप करून संविधान दिंडीचे महत्त्व विशद करण्यात येते. संविधान चित्ररथास वारकऱ्यांचा आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतो. वारकरी दिंडी च्या मार्गाने वारकऱ्यांच्या विसाव्या ठिकाणी प्रबोधनात्मक, संविधान आधारित विविध उपक्रम, कार्यक्रम, शाहीरी जलसा यांचे आयोजन करण्यात येते. संविधान दिंडीमध्ये बार्टीचे निबंधक इंदिरा आस्वार,विभाग प्रमुख श्रीमती स्नेहल भोसले,विभाग प्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, विभाग प्रमुख श्री. रवींद्र कदम ,विभाग प्रमुख, आरती भोसले, विभाग प्रमुख सतीश पाटील, विभाग प्रमुख अनिल कारंडे, कार्यालयीन अधीक्षक सचिन जगदाळे,सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक नसरीन तांबोळी, प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे व मनोज खंडारे, तेजस्वी सोनवणे विशाखा सहारे, उषा भिंगारे तसेच इतर प्रकल्प अधिकारी व समतादूत यांचा समावेश आहे

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img