तालुकास्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन
म.रा.म.पत्रकार संघ व सिद्धार्थ सोशल फाउंडेशन यांच्या वतीने गुणी जनाचा सन्मान सोहळा
अक्कलकोट,प्रतिनिधी
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीना
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व सिद्धार्थ सोशल फाउंडेशनच्या वतिने आदर्श पुरस्कार दिला जातो.सन २०२३मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे.तरी आदर्श कार्य केलेल्या व्यक्तीने प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष कमलाकर सोनकांबळे यांनी केले आहे.
अक्कलकोट तालुक्यात विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्यांना आदर्श गुणवंत लोकांचे सन्मान सोहळा कार्यक्रम ,प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे,राज्य संघटक संजय भोकरे, सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे,प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव,जिल्हाध्यक्ष मनीष केत यांच्या मार्गदर्शनाखाली पुरस्काराचे वितरण कार्यक्रम आयोजन करण्यात येत आहे.
वैद्यकीय,पत्रकारिता,सामाजिक,शैक्षणिक,
कला व क्रीडा,उद्योजक,प्रशासकीय अधिकारी,आदर्श सरपंच आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या मान्यवरांचा तालुकास्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.उत्कृष्ट व उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तीनी पुरस्कारासाठी ३० सप्टेंबर पर्यंत प्रस्ताव पाठवण्यात यावे.त्याकरिता मो.न.९९२१९८८३५८ आणि७५८८२१ ४९७४या व्हाट्सअपवर तालुकास्तरिय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्यात यावा.कोणत्या क्षेत्रासाठी प्रस्ताव सादर केला आहात आपण करीत असलेल्या व्यवसाय आपण ज्या क्षेत्रात उल्लेखनीय केलेले कार्य त्याची झेरॉक्स प्रत सोबत पाठवावे.दिनांक ३० सप्टेंबर २०२३ नंतर आलेला प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही,सदस्य समितीचा अंतिम निर्णय राहील असे संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे