सोलापूर येथील जिल्हा परिषद मधील
भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पंचायत समिती अक्कलकोट येथे काम बंद आंदोलन
अक्कलकोट ( प्रतिनीधी )
मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या कक्षा वरती झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती अक्कलकोट येथे काम बंद आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना गट विकास अधिकारी सचिन खुडे म्हणाले की, जोपर्यंत समाजकंटकावर कारवाई होत नाही. तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्धार व्यक्त आले यावेळी गटविकास अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार शिरसाट यांना निवेदन देण्यात आले यावेळी श्रीमती बीडला उप अभियंता बांधकाम, श्रीमती शेख गटशिक्षणाधिकारी, उंबरजे उप अभियंता लघु पाटबंधारे, डॉक्टर करजखेडे तालुका वैद्यकीय अधिकारी, रुपनर परिचारक प्रशासनाधिकारी, तसेच सर्व संवर्ग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अभय निलुरे , निकम, अनिल बिराजदार , रेवणप्पा बोरगाव, बसवराज दिंडोरे, उदय सोनकांबळे, शिंदे मॅडम कुलकर्णी मॅडम, वाले, डॉ महिबुब मनेरी, सोनटक्के, शेख व पंचायत समिती सर्व संवर्गाची कर्मचारी उपस्थित होते.