2 C
New York
Monday, January 13, 2025

Buy now

spot_img
spot_img

तालुक्यात जंतूनाशक फवारणी करुन डेंग्यू आजाराला आळा घाला- : विकीबाबा चौधरी

तालुक्यात जंतूनाशक फवारणी करुन डेंग्यू आजाराला आळा घाला- : विकीबाबा चौधरी

आठ दिवसांत संपूर्ण तालुक्यात फवारणी न केल्यास तीव्र अंदोलन छेडू.

 

अक्कलकोट प्रतिनिधी

अक्कलकोट शहर व तालुक्यात जंतूनाशक औषधाची फवारणी करून डेंग्यू रोगाचा नायनाट करण्याबाबत संबंधित कार्यालय अधिकारी यांना आज पीपल्स रिपब्लिकन पार्टी रोजगार आघाङी प्रदेशाध्यक्ष विकीबाबा चौधरी यांच्याकडून निवेदन सादर करण्यात आले.अक्कलकोट शहर व तालुक्यामध्ये सध्या डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.सर्वत्र जंतूनाशक रोगाची साथ वाढत आहे.जंतूनाशकांची फवारणी अक्कलकोट शहर व संपूर्ण ग्रामीण भागात करण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी रोजगार आघाङी प्रदेशाध्यक्ष विकीबाबा चौधरी यांनी केली आहे. तालुक्यात अनेक नागरिक सध्या आजारी पडताना दिसतात.त्वरीत अक्कलकोट शहर व तालुक्यात जंतूनाशक फवारणी करुन नागरिकांना दिलासा देण्याची मागणी निवेदनात करण्यात आले आहे.येत्या आठ दिवसात संपूर्ण तालुक्यामध्ये जंतूनाशक फवारणी करण्यात यावी.अन्यथा तालुक्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टी रोजगार आघाङी च्या वतीने अंदोलन छेडण्याचा इशारा विकीबाबा चौधरी
यांनी दिले आहे.सध्या तालुक्यात जेऊर गट ,वागदरी गट, चपळगाव गट, अक्कलकोट शहर , करजगी गट तसेच संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जंतूनाशक फवारणी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आले आहे.यावेळी पीपल्स रिपब्लिकन रोजगार आघाडी प्रदेशाध्यक्ष विकीबाबा चौधरी, युवा अध्यक्ष शांतू घोडके, मुकेश बनसोडे, लालसिंग राठोड, युवराज बनसोडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -spot_img
spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img