ग्रामपंचायत गोगांव येथे मेरी मिट्टी मेरा देश अभियान संपन्न
अक्कलकोट ( प्रतिनीधी) ग्रामपंचायत गोगांव ता. अक्कलकोट येथे मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत दिनांक 26 सप्टेंबर रोजी सकाळी ठीक 9 वाजता ग्रामपंचायत कार्यालय उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, जेष्ठ सदस्य प्रदीप जगताप यांच्या उपस्थित विविध कार्यक्रम घेण्यात आले
जिल्हा परिषद शाळा पासून गावातील मुख्य रस्त्यावरून प्रभात फेरी काढण्यात आले
यावेळी अमृत कलश मध्ये गावातील माती व मूठभर तांदूळ संकलन करण्यात आले व ग्रामपंचायत समोर गावातील प्रतिष्ठित शेतकरी कल्याणराव बिराजदार, तंटामुक्त अध्यक्ष नितीन चव्हाण, ज्येष्ठ शेतकरी निवृत्ती सुरवसे, माजी तंटामुक्त अध्यक्ष सुर्यकांत जिरगे, भद्रप्पा मुलगे, मुख्याध्यापक दयानंद चोळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आकाश गायकवाड, माजी सैनिक पंडित मुळजे, शालेय विद्यार्थी, अंगणवाडी सेविका , महिला वर्ग यांनी जमा केलेले माती कलश मध्ये भरून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आले
स्वच्छता ही सेवा जनजागृती, स्वच्छता शपथ पंचप्राण, माझी वसुंधरा शपथ, प्राथमिक शाळेमध्ये निबंध स्पर्धा वकृत्व स्पर्धा वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा घेण्यात आले यावेळी डॉ लिंगराज नडगेरी, पोलीस पाटील चंद्रकला गायकवाड, अंगणवाडी सेविका भाग्यश्री सोनकवडे, तेजाबाई गुरव, आशा सेविका मधुमती गायकवाड, परमेश्वर गायकवाड, यासह गावातील ग्रामस्थ व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते