गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभूमीवर जिल्हा शांतता समितीची बैठक संपन्न
सोलापूर : विशेष प्रतिनीधी
आगामी काळात असणारे गणेश विसर्जन मिरवणूक व ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण कार्यालाकडून दिनांक २६.०९.२०२३ रोजी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आयोजीत करण्यात आली होती. सदर बैठकीसाठी श्री. कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर, श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, सोलापूर, श्रीमती मनिषा आवाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सोलापूर, श्री. हिंमत जाधव, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर या अधिकारी यांचेसह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शांतता समितीचे सदस्य, सामाजीक कार्यकर्ते, गणेश मंडळाचे कार्यकर्ते, मस्लीम समाजाचे मौलवी, प्रतिनिधी असे सुमारे ५०० लोक उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये सुरूवातीस शांतता समितीचे बैठकीस उपस्थित मान्यवर यांचे स्वागत करण्यात आले, गणेश मंडळाचे प्रतिनिधी, मुस्लीम समाजाचे प्रतिनिधी यांनी यावर्षी दिनांक २८.०९.२०२३ रोजी गणेश विसर्जन मिरवणूक व ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने दोन्ही मिरवणूका एकाच दिवशी न काढता गणेश मिरवणूक दिनांक २९.०९.२०२३ रोजी व ईद-ई-मिलाद ची मिरवणूक दिनांक २९.०९.२०२३ रोजी काढण्याचा संकल्प करून राज्यामध्ये आदर्श निर्माण केला आहे. या आदर्शवत संकल्प डोळ्यासमोर ठेवून मिवणूकीमध्ये डॉल्बी, कर्णकर्कश आवाज निर्माण करणारे साहीत्याचा वापर न करता शांततेच्या मार्गाने मिरवणूक काढणार असल्याचे आश्वासन दिले.
श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी यावर्षी जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आलेल्या गणेश मंडळासाठी सामाजीक संदेश देणारे देखावे, पर्यावरणपूरक, रचनात्मक देखावे व कोणत्याही कायद्याचा भंग न करता काढलेल्या मिरवणूका यांचे निरीक्षण करून उपविभागीय स्तरावर पुरस्कार देणार असल्याचे जाहीर केले. तसेच सोलापूर जिल्ह्यातील जनता ही उत्सवप्रीय व शांततेचा आग्रह धरणारी जनता असून यावर्षी देखील जनतेने शांततापूर्वक गणेश मिरवणूक साजरी करावी, कोणत्याही अफवांच्या आहारी न जाता त्याची खात्री करून शांतता राखण्याचे आवाहन केले.
मा.श्री.कुमार आशीर्वाद, जिल्हादंडाधिकारी, सोलापूर यांनी उपस्थीतांना मार्गदर्शन करताना गणेश मंडळांनी समाजोपयोगी उपक्रम राबवून गणेश उत्सव साजरा केला पाहिजे. विनाकारण सामाजीक धार्मीक तेड निर्माण होणार नाही, यासाठी प्रत्येक नागरिकाने सजग राहून उत्सव साजरे करावे. प्रशासकीय यंत्रणांनी उत्सव कालावधीत मंडळांना सर्व सुविधा पुरवाव्यात, सोलापूर जिल्ह्याचा इतिहास हा अतिशय शांततापूर्ण असून तो यापुढे ही अबाधीत ठेवण्याची आशा व्यक्त केली आहे.