लोक सहभागातून ग्राम विकास आराखडा तयार केला पाहिजे – मारुती बनसोडे
पंधराव्या वित्त आयोगातील शेवटच्या वर्षातील ग्रामविकास आराखडा म्हणजे 2024-25 वर्षाचा आराखडा लोक सहभागातून करावा तरच गावाचा सर्वांगीण विकास होईल असे मत यशदा चे राज्यस्तरीय प्रविण प्रशिक्षक मारुती बनसोडे यांनी व्यक्त केले आहे
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद धाराशिव, पंचायत समिती उमरगा यांच्या वतीने तालुक्यातील सर्व सरपंच व ग्राम विकास अधिकारी, ग्राम सेवक यांच्यासाठी दोन दिवसीय कार्यशाळा हॉटेल कोल्हापुरी दणका जकेकुर एम आय डी डी सी जवळ आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. सर्व प्रथम संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व इतनी शक्ती हमे दे ना दाता ही प्रार्थना घेण्यात आली आणि प्रशिक्षण कार्यशाळा सुरु करण्यात आली.गटविकास अधिकारी प्रशांत सिंग मरोड यांच्या मार्गदर्शना खाली व सहायक गट विकास अधिकारी संतोष वंगवाडे सर यांच्या पुढाकारातून ही प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत चांगली संपन्न झाली विस्तार अधिकारी संजय राऊत, श्रीनिवास पाटील, एन एस राठोड, श्री पवार यांच्या उत्तम संयोजनाने यशस्वी झाली तालुक्यांतील सर्व सरपंच, ग्राम विकास अधिकारी, ग्राम सेवक यांचा चांगला प्रतिसाद मिळाला ग्राम विकास आराखडा प्रात्यक्षिक करून सादर करण्यात आले. यात नऊ गट पाडून प्रत्यक्ष चर्चा करुन अतिशय सुंदर आराखडे तयार करण्याचे काम यावेळी सादरी कारणातून दिसुन आले. शाश्वत विकासाची ध्येय साध्य करण्यासाठी भारत सरकारने नऊ संकल्पना तयार केल्या आहेत. त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी लोक सहभागातून विकास आराखडा कसा तयार करायचा याची माहिती देण्यास आली यावेळी यशदाचे अन्य दोन प्रविण प्रशिक्षक वैशाली घुगे व सत्यवती इंगळे यांनी ही मार्गदर्शन केले आहे सरपंच ग्राम विकास अधिकारी, ग्राम सेवक यांनी चर्चेत सहभाग घेतला ही कार्यशाळा अत्यंत प्रभावी ठरली आहे