बार्टी संस्थेत डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण पुन्हा रुजू..
बार्टीत डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले स्वागत..
पुणे – ( प्रतिनीधी )
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे येथे पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ अधिकारी डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांची महाराष्ट्र शासनाने प्रतिनियुक्ती द्वारे बार्टी संस्थेत (विभागप्रमुख) विस्तार व सेवा या पदावर दिनांक २६ ऑगस्ट २०२२ रोजीच्या शासन निर्णयाने नियुक्ती केली होती.
डॉ. चव्हाण हे छत्रपती संभाजी राजे, भीमा कोरेगाव युद्धाचे तसेच महारांच्या लष्करी ईतिहासाचे अभ्यासक असुन अभ्यासू व परखड वक्ते म्हणून त्यांचा परिचय आहे.
त्यांनी बार्टीत विभागप्रमुख म्हणून भरीव काम केले.
लम्पी आजाराचे कारन देत त्यांच्या पशुसंवर्धन विभागाने २९ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांच्या विभागात परत बोलावले होते.
डॉ. चव्हाण यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना १३ फेब्रुवारी २०२३ रोजी बार्टीत विभागप्रमुख पदावर पुनश्य नियुक्ती केली.
डॉ. चव्हाण यांनी विस्तार व सेवा आयबीपीएस विभागाचा विभागप्रमुख म्हणून अनुसूचित जातीतील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवुन न्याय दिला.
परंतु पशुसंवर्धन विभागाने त्यांची प्रतिनियुक्ती लम्पी आजाराचे कारण देत दिनांक ५ ऑक्टोबर २०२३ रोजी त्यांची त्यांच्या मुळ विभागात बदली केली होती.
डॉ. चव्हाण यांनी दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ बार्टी संस्थेतील बुद्धरुपास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
डॉ. चव्हाण यांची विभागप्रमुख या पदावर पुनश्य नियुक्ती झाल्याबद्दल श्रीमती स्नेहल भोसले, विभागप्रमुख बार्टी, श्रीमती इंदिरा अस्वार, निबंधक, बार्टी यांच्या हस्ते डॉ. चव्हाण यांना पंचशिलेची शाल, पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत करण्यात आले.
विभागप्रमुख श्रीमती स्नेहल भोसले, प्रकल्प व्यवस्थापक डॉ. प्रेम हनवते यांनी डॉ. चव्हाण यांनी बार्टीत आपल्या कामामुळे वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे सांगून स्वागत केले.
याप्रसंगी विभागप्रमुख श्रीमती आरती भोसले, शुभांगी पाटील, कार्यालय अधिक्षक डॉ. संध्या नारखेडे, प्रज्ञा मोहिते, प्रकल्प व्यवस्थापक नितिन सहारे, डॉ. सारिका थोरात, शुभांगी सुतार, महेश गवई, सुमेध थोरात, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक डॉ. अंकुश गायकवाड, नसरिन तांबोळी, प्रकल्प अधिकारी श्रीमती सुनंदा गायकवाड, मनोज खंदारे, तेजस्वी सोनवणे, माधुरी सोनवणे, जागृती गायकवाड, सचिन नांदेडकर, उषा भिंगारे, गौरी वाघमारे, सुनिता कदम, आकाश कु-हाडे, महंमद कलाल, राहुल अहिवळे, राहुल कवडे यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचलन प्रकाशन व प्रसिद्धी विभागाचे रामदास लोखंडे यांनी केले.
आभार सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक विकास गायकवाड यांनी मानले..