सोलापूर येथील नेहरू युवा केंद्र बनले तळीरामाचा अड्डा
संपूर्ण जिल्ह्यात व्यसनमुक्ती चळवळ उभे करणारे नेहरू युवा केंद्रात दारूच्या बाटल्या
सोलापूर ( प्रतिनीधी ) नेहरू युवा केंद्राच्या सोलापूर कार्यालयात पाहणी केली असता भरलेल्या दारूच्या बाटल्या आणि दारूचे ग्लास सापडले, सरकारी कार्यालयात दारूच्या बॉटल सापडणे अत्यंत गंभीर आहे, ऑन ड्युटी अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात दारू ठेवत असतील आणि ऑन ड्युटी दारू पीत असतील तर नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अजित कुमार आणि मल्टी टास्क ऑफिसर सुभाष चव्हाण यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ केले पाहिजे. स्वतः सुभाष चव्हाण ऑफिसमध्ये दररोज दारू पीत असल्याची माहिती जिल्हा युवा अधिकारी अजित कुमार यांनी आम्हाला दिली आहे. याबाबत जिल्हाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद यांच्याकडे कठोर कारवाई करण्याची मागणी विकास वाघमारे यांनी केली आहे.
नेहरू युवा केंद्राच्या वतीने युवकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असतो खेळा सोबत स्वयंरोजगार प्रशिक्षण, व्यसमुक्ती कार्य ही नेहरू युवा केंद्राच्या वतीने घेण्यात येत असतो मात्र याच ठिकाणी दारूचा अडा बनवले असेल तर दुर्देवी आहे
याठिकाणी अनेक कार्यक्रम बोगस दाखवून बिले उचलण्यात येत असून त्याच्या मास्टरमन चव्हाण असल्याचा अनेक संस्थेचे संचालक , अध्यक्ष बोलत आहेत त्या ठिकाणी संस्थेने कुठल्याही योजनेसाठी प्रस्ताव दिल्यास चव्हाण हा आर्थिक व्यवहार केल्याशिवाय मंजूर करतच नसल्याचे कळतो
या सर्व बाबीकडे जिल्हाधिकारी यांनी त्वरित लक्ष घालून संबंधित जिल्हा समन्वयक अजित कुमार व चव्हाण यांना त्वरित निलंबित करून खात्यानिहाय चौकशी करून कडक कार्यवाही करण्याची मागणी जिल्ह्यातील अनेक संस्थेने व युवकांनी करत आहे
नेहरू युवा केंद्राच्या सोलापूर जिल्हा कार्यालयात दारूच्या बाटल्या आणि अन्य सामुग्री सापडली. विकास वाघमारे यांनी ही धाड टाकली. त्यांचे अभिनंदन.
मी गेल्या काही वर्षांपासून या कार्यालयातर्फे ग्रामीण भागात आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होत आलो आहे पण या कार्यालयात हा प्रकार अलीकडे सुरू झालेला असावा. जवळपास दोन वर्षांत फारसा संबंध नाही.
धाड पाहून विलक्षण खेद वाटला.
या कार्यालयाच्या प्रमुखाचा पगार उपजिल्हाधिकाऱ्यापेक्षा जास्त असतो. केंद्र सरकारचे असे आणखी एक कार्यालय आहे. ते म्हणजे क्षेत्रीय प्रचार कार्यालय.
या दोन्ही कार्यालयांचे कर्मचारी कधी संपर्कात आले तर आपल्याला कसे काहीच काम नसते हे सांगत असतात.
एकेका कार्यालयात कर्मचाऱ्यांचा पगार धरून १५ ते २० लाख रुपये खर्च केला जातो. पण महिन्यात फारतर एक दोन कार्यक्रम असतात.
अरविंद जोशी
जेष्ठ पत्रकार,