बेंगळुरू येथे “ऊर्जा मेला” अंतर्गत होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनास श्री एस एस शेळके प्रशाला,वागदरी येथील सहा विद्यार्थ्यांची निवड
अक्कलकोट ( प्रतिनीधी )
टाटा पॉवर लिमिटेड आणि अगस्त्य इंटरनेशनल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने 28 ऑक्टोबर रोजी बेंगळुरू येथे होणाऱ्या ” ऊर्जा मेला “अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनास श्री एस एस शेळके प्रशाला वागदरी येथील सहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या प्रदर्शनास प्रशालेतील पवन शिवपुत्र चोळ्ळे,शुभम शिवानंद हुलगिरी,अस्मिता महालिंगप्पा कलबुर्गी, समृद्धी सोन्याबापु शिरगापुरे, प्रतिभा बसवराज व्हनकोरे, धानेश्वरी मंहातेय्या स्वामी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.”अँप्लिकेशन ऑफ सोलर सिस्टिम ” यावर आधारित सदर विद्यार्थ्यांनी प्रतिकृती तयार केली आहे.
सदर विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक प्रदीप पाटील, ईमाम कासिम बागवान, शिवशरण गवंडी, दत्तात्रय होटकर,शिवलिंगप्पा गंगा,बालाजी चौगुले,मल्लम्मा कोळी,आरती बिराजदार यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन श्री बसवराज शेळके सावकार, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य अनिल देशमुख, पर्यवेक्षिका शैलशिल्पा जाधव,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.