शेतकरी व कामगारासाठी उजनी धरणाचे पाणी एक वरदान आहे : सागर कल्याणशेट्टी
अक्कलकोट / गौतम बाळशंकर
उजनी धरणाचे पाणी कष्टकरी व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे वरदान असल्याचे प्रतिपादन हन्नुर ग्रामपंचायतचे उपसरपंच युवा नेते सागर (दादा) कल्याणशेट्टी यांनी केले. हन्नुर येथील हरणा नदीच्या काठी उजनी धरणाचे पाणी आल्यानंतर पाण्याचे पूजन करीत असताना बोलत होते. उजनी धरणाचे पाणी आल्यामुळे अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील. शेतकऱ्याचे व कष्टकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण करु आणि त्यासाठी सदैव आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण आखले आहे. विरोधकाच्या धोरणाला खत पाणी न घालता. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट विधानसभा क्षेत्रामध्ये उजनी धरणाचे पाणी आले आहे. खरा शेतकऱ्याचे हित पाहणारा पाणीदार आमदार म्हणून आमदार सचिन दादांचे नाव विधानसभा क्षेत्रात मध्ये कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पत्रकार गौतम बाळशंकर, माजी उपसरपंच शरणाप्पा हेगडे, राम परतनले,तंटामुक्ती अध्यक्ष सिद्राम पुजारी,ग्रामपंचायत सदस्य शैलेश पाटील, घोडूभाई जमादार, अर्जुन जळकोट, सलीम मुल्ला,शरणाप्पा बंदिछोडे,महेश चितले,भरत टिकबरे, भीम भरमशेट्टी, आदी गावकरी कष्टकरी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.