24.6 C
New York
Saturday, September 14, 2024

Buy now

spot_img

पत्रकारांच्या समस्यांची जाणीव असणारे नेतृत्व – डॉ. विश्‍वासराव आरोटे

पत्रकारांच्या समस्यांची जाणीव असणारे नेतृत्व – डॉ. विश्‍वासराव आरोटे

पत्रकारिता करताना निस्वार्थीपणाची भावना अंगीकारून पत्रकारांच्या समस्यांचे निराकरण करून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पत्रकार संघाचा अमृतवेल वाढविण्याचे काम व ग्रामीण पत्रकारांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचे काम करून देणारे नेतृत्व म्हणजे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ.विश्‍वासराव आरोटे हे होय.
चितळवेढे (ता. अकोले जि. अहमदनगर) या छोट्याशा डोंगर कुशीतील आणि प्रवरामाईच्या तिरावर असलेल्या गावी त्यांचा जन्म झाला. परिस्थिती बेताचीच असल्यामुळे प्राथमिक शिक्षण जन्मगावी पूर्ण केले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण मा. मधुकरराव पिचड माध्यमिक विद्यालय राजुर येथे पूर्ण केले तर महाविद्यालयीन शिक्षण अकोले येथील महाविद्यालयात पूर्ण केले परिस्थिती सामान्य असल्यामुळे शिक्षण घेत असताना सकाळी चितळवेढे येथून दूध घेऊन यायचे नंतर वर्तमानपत्र वाटण्याचे काम करायचे वर्तमानपत्र वाटत असताना वेळ मिळेल तेव्हा ते वाचत असायचे असा नित्यक्रम सुरू झाला. वर्तमानपत्र वाचता वाचता पत्रकारीतेची झालेली ओळख आज त्यांना उच्च पदावर घेऊन गेली.
ग्रामीण भागात वृत्तपत्र पोचवून ग्रामीण भागातील खप वाढवायचा असेल तर त्या भागातील समस्या समजून घेऊन वृत्तपत्रात त्याची मांडणी होणे आवश्यक आहे याची जाणीव विश्‍वासरावांना झाल्यानंतर त्यांनी ग्रामीण भागातूनच आपल्या पत्रकारीतेचा श्रीगणेशा केला आणि ग्रामीण भागातील समस्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला .आणि ध्येयवेडी स्वप्ने उराशी बाळगून कर्तव्य करत राहिले यावेळी ग्रामीण भागातील वास्तव मांडताना अनेक अडीअडचणी आल्या परंतु मुळातच परंतु मुळातच अकोले तालुक्याला विचारांचा वारसा लाभलेला असल्यामुळे पत्रकारीता क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ पत्रकारांशी त्यांची विचारसरणी जुळली. त्यातूनच मार्गदर्शनाची दिशा मिळत गेली .कतृत्व आणि नेतृत्व याचा सुरेख संगम अस्तित्वात आला. लेखणीला चालना देता देता ग्रामीण भागातील वास्तव मांडतांना व दैनिक गावकरी या वृत्तपत्रात काम करत असताना ग्रामीण भागातील पत्रकारांशी त्यांची नाळ जोडली गेली त्यातूनच ग्रामीण समस्यांची उकल त्यांनाच झाली. समस्या सोडवण्यासाठी काही तरी केले पाहिजे या उद्देशाने संघटन बांधणी सुरू केली बातमीदारीत्यांना मोठ्या पदावर घेऊन गेली. वार्ताहर म्हणूनअनेक वृत्तपत्रांमध्ये काम केल्या नंतर तालुका प्रतिनिधी आणि नंतर विभागीय कार्यालयाचे उपसंपादक म्हणून त्यांनी दैनिक गांवकरी’या उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिकाची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलली. गांवकरीच्या माध्यमातून ग्रामीण भागाची, या भागातील ग्रामस्थांची विश्‍वासार्हता जपली. त्यांचे प्रश्‍न आपल्या लेखनीच्या माध्यमातून सातत्याने मांडले. पत्रकारीताकरत असतानाच ग्रामीण भागातील पत्रकारांशी देखीलत्यांची नाळ जोडली गेली. या पत्रकारांच्या समस्या त्यांना आपल्या समस्या वाटू लागल्या. या समस्या सोडविण्यासाठी काही तरी केले पाहिजे, असे सारखे वाटत होते. त्यांनी ग्रामीण भागात काम करणार्‍या पत्रकारांची मोट बांधली. सर्वांना बरोबर घेऊन अकोले तालुका ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना केली. या पत्रकार संघाच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांसाठी खर्या अर्थानेकार्य सुरु केले. हे काम करत असतानाच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचेराज्य संघटक संजय भोकरे यांचा संपर्क आला. दोघांचेही ध्येय एकच..पत्रकारांच्या समस्या सातत्याने मांडून त्यासाठी राज्यस्तरावर नव्हे तरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करणे. ध्येय्य एकच असल्याने या जोडगोळीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकारसंघाच्या माध्यमातून एकत्रित काम सुरु केले.
पत्रकारांसाठी चालविल्या जात असलेल्या या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राज्यस्तरीय अधिवेशने घेतली. जिल्ह्यात, तालुक्यात विविध मेळावेघेतले. राज्यभरातीलसर्व जिल्ह्यातील पत्रकारांना या पत्रकार संघामध्ये सामावून घेतले. प्रत्येकाला संघाचे ओळखपत्र देऊन नवी ओळख दिली. सर्वच जिल्ह्यातील पत्रकारांचा विमा काढून खर्‍या अर्थाने पत्रकार संघ या पत्रकारांसाठी काम करतअसल्याचा विश्‍वास निर्माण केला. संघटनेच्या पदाधिकार्यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अहमदनगर जिल्ह्याध्यक्ष आणि नंतरराज्य सरचिटणीस या पदावरकाम करण्याची संधी दिली. राज्य कार्यकारिणीवर काम करतानाचत्यांचे काम अतिशय जोमाने सुरु झाले.
स्पर्धा परीक्षांबरोबरच क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या गुणवंतांचा राज्यस्तरावर गौरव पत्रकारसंघाच्या माध्यमातून केला जात आहे. पंडीत श्रीश्रीरविशंकरजी यांनाही पत्रकार संघाने गौरविले आले. हलाखीची परिस्थिती असणार्या पत्रकारांना औषधोपचारासाठी व इतरगरजा भागविण्यासाठी पत्रकारसंघाच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्नही डॉ.विश्‍वासराव आरोटे यांनी केला आहे. अशा राज्यभरातून अनेक पत्रकारांना संघटनेने आर्थिक मदत केलीआहे.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, सुशिलकुमार शिंदे, समाजसेवक अण्णा हजारे, विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील, दिवंगत गोपीनाथ मुंडे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी मंत्री दिलीप वळसे, पद्माकर वळवी, रामराजे निंबाळकर, बबनराव पाचपुते, बाळासाहेब थोरात, राम शिंदे, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादापाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदींकडे त्यांनी सातत्याने पत्रकारांच्या विविध समस्या मांडल्या. पत्रकारांना संरक्षण मिळावे यासाठी संरक्षण कायदा व्हावा यासाठी ते नेहमीच आग्रही राहीले. पत्रकारांवर होणार्‍या हल्ल्यांचा निषेध करत आरोपींना अटक होईपर्यंत पाठपुरावा केला. ग्रामीण भागातील पत्रकारांनाही श्रमिक पत्रकारांप्रमाणेच अ‍ॅक्रीडीशन कार्ड मिळावे, एस. टी. बस तसेच रेल्वेसारख्या विविध सवलती मिळाव्यात, शासनानेत्यांचा आरोग्य विमा काढावा, पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती द्याव्यात, पत्रकारांना निवासासी व्यवस्था उपलब्ध करावी या व अशा अनेक मागण्यांसाठी पत्रकार संघाच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न विश्‍वासराव आरोटे करत आहेत. पत्रकारसंघाने याच मागण्यांसाठी मुंबई येथीलआझाद मैदानावर केलेल्या आंदोलनाची दखल राज्यपाल विद्यासागरराव यांनीही घेतली होती.
त्यांच्या कार्यकाळात अनेक पुरस्कार त्यांना मिळाले असुन त्यांनी केलेल्या कार्याचा तो सन्मान आहे.कोणताही पत्रकार असो त्यांना विश्‍वासराव माऊली म्हणुन संबोधतात त्यामुळे ते अधिक जिव्हाळ्याचे सबंध प्रस्थापीत करतात. त्यांना भरपुर आयुष्य व चांगले आरोग्य मिळो याच वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा!
शब्दांकन–… नवनाथ जाधव प्रदेश प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img