वाहन चालकासाठी करण्यात आलेला जाचक कायदा रद्द करण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन
शिरवळ : हणमंत घोदे
दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी केंद्र सरकाने पारित केलेल्या हिट ॲण्ड रन कायदा तातडीने रद्द करावा आणि वाहन चालकांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी अक्कलकोट तालुका चालक एकता संघ च्या वतीने माननीय तहसीलदार बाळासाहेब शिरसाट
यांना निवेदन देण्यात आले यावेळी अक्कलकोट तालुका चालक एकता संघाचे अध्यक्ष विठ्ठल चव्हाण, उपाध्यक्ष सागर जाधव,इरफान खोजे सचिव तेजस रंझुजारे, सचिन साखरे, सुदर्शन शितोळे व तालुक्यातील चालक मोठया संख्येने उपस्थित होते.