24.1 C
New York
Thursday, July 25, 2024

Buy now

spot_img

महार रेजिमेंटचे माजी सैनिक व समता सैनिक वतीने शौर्य स्तंभाला मानवंदना

महार रेजिमेंटचे माजी सैनिक व समता सैनिक वतीने शौर्य स्तंभाला मानवंदना

पुणे ( प्रतिनीधी ) 206 वा भीमा कोरेगाव शौर्य दिन आज खूप हर्ष उत्साहात रात्री साडे अकरा वाजता 31 डिसेंबर ला शौर्य स्तंभाला मानवंदना देऊन धुमधडाक्यात साजरा करण्यात आला, आतिषबाजी करण्यात आली सदर मानवंदनाला तमाम देशभरातून आलेले महार रेजिमेंटचे माजी सैनिक तसेच समता सैनिक दलातील हजारो सैनिक आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थित उत्साहात साजरा केला.

एक जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता महार रेजिमेंटच्या पेंडॉलमध्ये सर्व सैनिकांसह मार रेजिमेंट फ्लॅगला ध्वजारोहण करण्यात आले महा रेजिमेंटच्या माजी सैनिक तसेच परिवारासह मान वंदना देण्यात आली महार गान गाऊन महामान वंदना देण्यात आली. बँड पथकासह मार्च पास करण्यात आला रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये पंचशील चा ध्वज जय भीम तिरंगे आणि महा रेजिमेंट फ्लेक्स मार्च पास करण्यात आला मार्च पास करत विजय स्तंभाला महामानवंदना देण्यात आली विजय स्तंभाजवळ 700 सैनिका सह ठीक साडेनऊ वाजता महामानवंदना देण्याकरिता अनुशासनात्मक प्रक्रियेमध्ये माजी सैनिकांनी विजय स्तंभाला मानवंदना दिली महार गाना सोबत सर्वांनी आपले योगदान दिले. आजच्या या कार्यक्रमाला महा रेजिमेंटचे देशभरातील सैनिक व सैनिक परिवार यांनी येऊन शोभा वाढवली. हे यश सिद्धी आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य तसेच भिमा कोरेगाव महार सैनिक समन्वय समिती यांच्याकडून सर्व कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करण्यात आले विजय स्तंभाला मानवंदा देऊन मार्च पास करत वापस आपल्या पेंडॉलमध्ये सर्व सैनिकांनी आपले आपले विचार व मनोगत व्यक्त केले काही लोक शूरवीरांचा सत्कार करण्यात आला स्पोर्ट्स पसंत सत्कार करण्यात आला विशेष प्राधान्य प्राप्त अशा महिला एडवोकेट डॉक्टर खेळाडूंचा गुणगौरव करण्यात आला व त्यांचा शाल श्रीफळ नारळ देऊन महिलांना साडी बुके देऊन त्यांचाही मानसन्मान करण्यात आला. च्या कार्यक्रमाला 1000 च्या वर आणि महार सैनिक आणि उपस्थिती दर्शविली यामध्ये प्रामुख्याने बाहेरील राज्यांमधून जसे दिल्ली उत्तर प्रदेश कर्नाटका तामिळनाडू केरला एमपी छत्तीसगड येथील माजी सैनिकांनी सदर कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. सदर कार्यक्रमांमध्ये काही मान्यवरांचे आवर्जून उपस्थिती आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुभेदार प्रदीप गायकवाड साहेब . अनोरी कॅप्टन बाबू कोलके साहेब मार्गदर्शक, राज्यउपाध्यक्ष शिवपुत्र घटकामले , कोषाध्यक्ष शामराव भोसले , जनरल सेक्रेटरी कैलास खिल्लारे, ऍड.राजेंद्र कुमार खोब्रागडे साहेब कॅप्टन सुभाष कंकाल साहेब सुभेदार वसंत मस्के साहेब, सुभेदार मेजर बनसोड साहेब आणि पांडुरंग राऊत साहेब राहुल तांगडे साहेब, माननीय गजानन इंगळे साहेब सतीश नाईक सुदाम चावरे कॅप्टन बाजीराव सोनवणे असे 700 पेक्षा जास्त महा रेजिमेंटचे अनेक तथा इतर महार सैनिक सदर कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली होती आजचा कार्यक्रम अविस्मरणीय असा थाटामाटात गाजावाजा साजरा करण्यात आला आजचा क्षण सर्वांना टिपण्यासारखा असा अतुलनीय कार्यक्रम पार पडला.

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img