0.8 C
New York
Sunday, December 1, 2024

Buy now

spot_img

अक्कलकोट येथील मंगरूळ हायस्कूल मध्ये त्रिशरण फाउंडेशनची कार्यशाळा समारोप

अक्कलकोट येथील मंगरूळ हायस्कूल मध्ये त्रिशरण फाउंडेशनची कार्यशाळा समारोप

किशोरवयीन मुलींच्या आरोग्यासाठी होते अभियान

अक्कलकोट ( प्रतिनिधी) : अक्कलकोट,दक्षिण सोलापूर
सोलापूर शहरासह जिल्ह्यात त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशने या संस्थेने किशोरवयीन मुलींच्या आरोग्यासाठी मासिकपाळी प्रशिक्षण व समुपदेशन अभियान राबविले. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या संयुक्त विद्यमाने राबविलेल्या या विशेष उपक्रमात ७५ कार्यशाळा घेण्यात आल्या यांचा २२५० विद्यार्थिनींना लाभ मिळाला यांची सांगता समारोप अक्कलकोट येथील मंगरूळ हायस्कूल येथे करण्यात आले

मंद्रूप येथील महात्मा गांधी भवनमध्ये ७ डिसेंबरला किशोरवयीन मुलींसाठी मासिकपाळी प्रशिक्षण व समुपदेशन कार्यशाळेची सुरूवात करण्यात आली. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी व त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रज्ञा वाघमारे यांच्या हस्ते झाले. याच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनिता कोरे होत्या. यावेळी महापारेषणचे अधीक्षक अभियंता राम शेळके, नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, फाउंडेशनचे राज्य समन्वयक प्रशांत वाघमारे, संतोष भीमराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कदम, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचे सुगतरत्न गायकवाड,
फाउंडेशनचे राज्य समन्वयक प्रशांत वाघमारे, जिल्हा समन्वयक शितल कांबळे, अन्नपूर्णा लांडगे, सपना लोभे उपस्थित होत्या. यावेळी महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील आठवी नववी व दहावीच्या मुलींना मासिक पाळी बाबत माहिती देणाऱ्या किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रज्ञा वाघमारे म्हणाल्या, किशोरवयीन मुलींनी मासिकपाळी बाबत भीती बाळगू नये. आई होण्याची ही एक नैसर्गिक देण आहे. त्यासाठी आपल्या आरोग्याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. सरपंच कोरे, नायब तहसीलदार मोरे, प्राचार्य संतोष कदम यांनी त्रिशरण फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले. प्रस्ताविकात समन्वयक प्रशांत वाघमारे यांनी फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली.
सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सात डिसेंबर ते १० जानेवारी या कालावधीत विविध शाळांमध्ये अशाप्रकारे ७५ कार्यशाळा घेण्यात आल्या. याचा समारोप अक्कलकोट मध्ये करण्यात आला. येथील मंगरूळ हायस्कूल किशोरवयीन मुलींसाठी कार्यशाळा घेण्यात आली. मुख्याध्यापक
नंदाजी कदम व उपमुख्याध्यापक मल्लिनाथ पाटील, आरती तोडनूर, दैनिक यश सिद्धी न्युजचे संपादक कमलाकर सोनकांबळे, ज्योतिबा पारखे ,फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचे सुगतरत्न गायकवाड, विकासदूत अन्नपूर्णा लांडगे, श्वेता कांबळे, प्रगती भडकुंभे, वसुंधरा पवार, मयुरी ठाकूर,ऋषिता पद्मा, सुरज कांबळे, आकाश कांबळे, करण खालपुरे यांनी संपूर्ण कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच जिल्हा समन्वयक तथा पुणे विभागीय प्रमुख अध्यक्ष शितल कांबळे यांनी परिश्रम घेतले. या सर्व कार्यशाळा सोलापूर शहर व अक्कलकोट तालुका, मोहोळ तालुका, दक्षिण सोलापूर तालुका, उत्तर सोलापूर तालुकामध्ये घेण्यात आले.

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img