11.5 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img

कोटणुर येथील जाळपोळी च्या घटने नंतर कलबुर्गी जिल्हयात सर्वत्र शांतता

कोटणुर येथील जाळपोळी च्या घटने नंतर कलबुर्गी जिल्हयात सर्वत्र शांतता

कलबुर्गी : महेश गायकवाड

कलबुर्गी शहरा पासुन अवघ्या 20 किमी अंतरावर असलेल्या कोटनुर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी रात्री डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्या नंतर कलबुर्गी शहरात व जिल्ह्यात निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आली असून जिल्हयात सर्वत्र शांतता असल्याचे कलबुर्गीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी सुयश मीडिया ग्रुप शी बोलताना सांगीतले, कोटणूर तसेच कलबुर्गी शहरातील जाळपोळ आणि दगडफेक पुर्णपणे बंद झाली असून सर्वत्र शांतता प्रस्थापित करण्यात आली आहे

सोमवारी रात्री कलबुर्गी शहरा पासुन जवळच असलेल्या कोटणूर या गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी जय श्रीराम आणि जय जय राम असे म्हणत विटंबना केली होती या नंतर कलबुर्गी जिल्हयातील तमाम आंबेडकरी जनता तसेच ओबीसी एस सी एस टी मोयनारीटिज च्या तमाम संघटना एकत्र येत कलबुर्गी शहरात जागोजागी निषेध नोंदवित आंदोलन करून या घटनेतील जातीयवादी लोकांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आणि सर्वत्र रस्ते अडवून चौका चौकात आंदोलन सूरू केले
यांनतर उशिराने पोलीस प्रशासनाने आरोपींवर तातडीने कारवाई करून अटक करण्यात येईल असे आश्वासन दिल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी बोलतांना आंबेडकरी आणि. ओबिसी नेत्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान सहन करून घेणार नाही या देशात फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा कायदा चालतो डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एकटेच या देशाचे हिरो आणि नेते आहेत यापुढे जर असे प्रकार घडत राहिल्यास आम्हाला पेटून उठल्या शिवाय गत्यंतर नाही असे या वेळी नेत्यांनी सांगीतले
दरम्यान कलबुर्गी शहरातील परिस्थिती नियंत्रणात असुन सर्वत्र शांतता आहेः जनतेनी कोणत्याही अफवांवर आणि गोष्टींवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img