शरण जिरगे यांनी जपला वृक्षसंवर्धनाचा वसा
भूमिपुत्राने दिले गोगांव गावास विविध प्रकारचे झाडे भेट
अक्कलकोट ( प्रतिनीधी ) मुळचे गोगांव ता. अक्कलकोट येथील रहिवाशी सध्या पुणे येथे राहण्यास असलेले शरण तीपणा जिरगे यांनी गावाकडे आलेले ओढ,प्रेम, आपुलकी निमित्त गावाला काहीतरी देणं लागतो या विचाराने प्रेरित होऊन यंदाच्या यात्रेच्या वेळी उन्हात लागलेले चटके यांची विचार करून यात्रेच्या वेळी वर्ग मित्र उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांना दिलेले शब्द पाळत गावामध्ये विविध प्रकारचे १०१ झाडे ग्रामपंचायतीस भेट दिले आहे
सदर कार्याचा गावासह परिसरात कौतुक होत आहे विविध प्रकारचे झाडे हे आरोग्य उपकेंद्र , जिल्हा परिषद शाळा, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर, शाळेपासून गावापर्यंत झाडे लावण्यात आले यावेळी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, डॉ लिंगराज नडगेरी, आरोग्यसेविका अंबिका वळसंग, ग्रा. प. सदस्य शरणपा कलशेट्टी, मुख्याध्याक दयानंद चोळे, पुंडलिक वाघमारे, शंकर कारभारी किरण गायकवाड, काही झाडे गावकऱ्यांना लावण्यासाठी देण्यात आले झाडे लावा झाडे जगवा परिसर ऑक्सीजनमय ठेवा उन्हाळ्यामध्ये उन्हाचे चटके पासून बचाव करायचं असेल तर प्रत्येकानी एक झाड लावून त्याची पालन पोषण करावे असे आव्हान उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांनी केले