18.1 C
New York
Wednesday, November 6, 2024

Buy now

spot_img

अक्कलकोट आगाराचे आगार व्यवस्थापक एम. बी. जुनेदी यांना अक्कलकोट भूषण पुरस्कार जाहिर

एस टी महामंडळाच्या अक्कलकोट आगाराचे आगार व्यवस्थापक एम. बी. जुनेदी यांना अक्कलकोट भूषण पुरस्कार जाहिर

अक्कलकोट l प्रतिनिधि

दिवंगत चेअरमन शिवशरण खेडगी यांच्या व्दितीय स्मृति दिनानिमित्त आगार
व्यवस्थापक एम बी जुनेदी यांच्या सह विविध क्षेत्रातील व्यक्तींचा अक्कलकोट भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

अक्कलकोट एज्युकेशन
सोसायटीचे दिवंगत चेअरमन शिवशरण चनबसप्पा खेडगी
यांच्या व्दितीय पुण्यस्मरणानिमित्त ‘शिव-शरण अक्कलकोट भूषण’ सन्मान सोहळा आणि विविध क्षेत्रातील आदर्श पुरस्कार जाहीर झाले असून या पुरस्कारांचे वितरण सोमवारी दि. २४ जून रोजी सकाळी १० वाजता सी. बी. खेडगी इंटरनॅशनल स्कूल येथे करण्यात येणार आहे.

अक्कलकोट येथील राज्य परिवहन महामंडळाच्या अक्कलकोट आगाराचे डेपो मेनेंजर एम बी जुनेदी
हे एस टी महामंडळाची अक्कलकोट तालुक्यात उत्कृष्ट सेवा देत असल्याबद्दल

त्यांचा स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र आणि शाल पांघरून गौरव करण्यात येणार आहे.
हा गौरव पुरस्कार समारंभ
माजी खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य, शिवाचार्य शिवबसव राजेंद्र महास्वामीजी (खेडगी), श्री. ष. ब्र. जयगुरुशांतलिंगराध्य शिवाचार्य (हिरेजेवरगी), श्री. शिवलिंग महास्वामीजी (मादन हिप्परगा), श्री. प्रभुशांतलिंगेश्वर महास्वामीजी (हत्तीकणबस) व श्री. बसवलिंग महास्वामीजी ( अक्कलकोट)
यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
कर्तव्य शिल असलेले आगार व्यवस्थापक एम बी जुनेदी यांना अक्कलकोट भूषण पुरस्कार मिळाल्या बध्दल त्यांचे जनतेतून स्वागत केले जात असुन सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img