18.8 C
New York
Monday, September 16, 2024
No menu items!

Buy now

No menu items!
spot_img

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाल सुरू, सुरळीत बस सेवा पूर्वी प्रमाणे न सोडल्यास पालकांनी करणार आंदोलन

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाल सुरू, सुरळीत बस सेवा पूर्वी प्रमाणे न सोडल्यास पालकांनी करणार आंदोलन

किलो मिटरच्या सक्तीमुळे अक्कलकोट आगाराच्या एस टी बस गाडया रिकाम्या फिरू लागल्या

गाड्यांची कमतरता असतानाही सोलापूरला सात मुक्काम

अक्कलकोट l कमलाकर सोनकांबळे

अक्कलकोट एस टी डेपोच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी पणामुळे अक्कलकोट तालुक्याील एस टी ची सेवा विस्कळित झाली असुन गरज नसताना ग्रामीण भागातील फेऱ्या रद्द करून दररोज 15 ते 20 गाड्या पुण्याला रिकाम्या पळवल्या जात आहेत. तर गाड्यांची कमतरता असतानाही सोलापूरला गरज नसताना सात मुक्काम ठेवले आहेत. केवळ सर्व्हिस जपण्यासाठी आणि एस टी चे अर्थिक तोटा वाढविण्यासाठी आणि सोलापूर मुक्कामाला गरज नसताना व कोणत्याही प्रवाशांची मागणी नसताना सात गाड्या मुक्कामसाठी चालवल्या जात आहेत.

अक्कलकोट आगाराचां हम करेसो कायदा आणि मनमानी पद्धतीने कामकाज करणे यामुळे एस टी गाड्या अक्कलकोट तालुक्यांत रिकाम्या फिरू लागल्या आहेत.
दुसरी गंभीर बाब म्हणजे किलो मिटर च्या सक्तीमुळे अक्कलकोट आगाराच्या एस टी गाडया सद्या रिकाम्या फिरू लागल्या आहेत आंबेवाड मुक्काम ही गाडी जाते जाते येते वेळी रिकाम्या धावत आहेत परंतु याचे कसलेही सोयर सूतक स्थानक प्रमुख यांना हि नाहीं आणि डेपो मैंनेंजर यांना ही राहिले नाही केवळ डिझेल जास्त लागले कमी केपीटीएल आणले म्हणुन दररोज चालक वाहकांना पंख्याची थंडगार हवा खात कार्यालयात बसलेले डेपो मेनेजर यांना तालुक्यात कोणत्या गावाला कोणत्या वेळी गाडी जायला हवी याचे कसलेही ज्ञान नाही अक्कलकोटच्या भौगोलिक परिस्थितीची माहिती नाही असा अडाणी डेपो मॅनेजर अक्कलकोट डेपोला यापूर्वी कधीही लाभला नव्हता परंतु केवळ दिवसभर कागदी घोडे नाचवत आणि फायलीची डोंगर रचत बसलेले हे डेपो मॅनेजर महाशय एस टी बस गाड्याच्या स्वच्छतेकडे ही दुर्लक्ष करून अक्कलकोट तालुक्यातील जनतेसाठी अस्वच्छ गाडया मार्गावर पाठवत आहेत.

उडचण आणि शिवूर मुक्कामच्या गाडया दुसऱ्या दिवशी एकामागे एक जात असल्यामुळे या दोन्ही गाडया प्रवाशी नसल्यामुळे रिकाम्या जात आहेत याबाबत विचारणा केली असता वरूनच डायनिंग आले आहे यात काही ही बदल करता येत नाही अशी गोलमाल उत्तरे डेपो मॅनेजर चालकाना देत असतात.

केवळ किलो मिटरच्या सक्तीमुळे एस टी गाडया रिकाम्या फिरवण्याची दुर्दैवी वेळ चालकावर आली आहे.
अक्कलकोट डेपोला केवळ 65 गाड्यांची संख्या असताना पुणे मार्गावर दररोज विनाकारण 20 गाडया पाठवल्या जात आहेत अक्कलकोट तालुक्यात गावोगावी आणि गरजेच्या ठिकाणी गाडया न सोडता दररोज पुणे मार्गावर 20 गाडया सोडण्याचा अट्टाहास कशासाठी असा सवाल प्रवाशी वर्गमधून केला जात आहे. पुणे मुंबईला जाणारे प्रवाशी सोन्याचे नाणे देतात आणि ग्रामीण भागातील प्रवाशी काय लोखंड देतात काय? असा सवाल करुन प्रवाशांनी म्हणाले आहे की, जर अक्कलकोट तालुक्यात पुरेशा गाड्या सोडल्या नाहित तर पुण्याला जाणाऱ्या सर्व एस टी बस गाड्या अडवून आंदोलन केले जाईल.
इतकेच नाही तर सोलापूर जिल्ह्यात काय इतर डेपो नाहित काय अक्कलकोटच्या डेपोला अगोदरच एस टी बस कमी असताना पुणे साठी दररोज 20 गाडया कशा साठी सोडल्या जात आहेत याची चौकशी करावी अन्यथा याबाबत ची तक्रार मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात येईल असा इशारा वागदरी, दुधनी, मैंद्रगी, कोन्हाळी, किरणळी या भागातील प्रवाशांनी दिला. आहे.
विशेष गंभीर घटना म्हणजे ग्रामीण भागातील मुक्काम बंद करण्यात येवुन सोलापूर ला सात मुक्काम कशा साठी सुरू ठेवण्यात आले आहेत यात कुणाचा इंटरेस्ट आहे कोणाला आर्थिक मलिदा मिळत आहे असेही शंका व्यक्त केल्या जात आहेत.
गाड्यांची कमतरता असतानाही सोलापूरला सात मुक्काम चालवून वारंवार घोळसगाव आणि मडी सलगर मुक्काम बंद करण्यात येते आबेवाड मुक्काम ची गरज नसताना तिथे मुक्काम सूरू ठेवण्यात आला आहे केवळ सलगर पर्यंतच 4 ते 5 प्रवाशी असतात सलगरच्या पुढे एक ही प्रवाशी नसतो
मुरूम मुक्काम उमरगा मुक्काम लातूर मुक्काम बंद पाडणारे याच अक्कलकोटचे एस टी बस स्थानकातील कामचुकार कर्मचारी आहेत लोकांचा गाड्या सोडण्याचा तगादा मागे लागु नये म्हणुन आणि केवळ स्वतःला वाचविण्यासाठी वाहतूक नियंत्रक वारंवार घोळसगाव किंवा मडी सलगर मुक्काम बंद करण्यात धन्यता मानत असतात. किँवा अनेक ठिकाणीं एस टी बस न सोडता किलो मिटर करून घेण्यासाठी एस टी बस सोडण्यात अक्कलकोट डेपोचा पहिला नंबर आणण्यासाठी बस स्थानकातील सर्वच वाहतूक नियंत्रक कामे करत असतात याकडे कागदी घोडे नचवणारे डेपो मॅनेजर पद्धतशी दुर्लक्ष करतात.

चौकट
किरणळी मार्गे घोळसगाव मुकाम बस हे अत्यात गरजेचे असून सदर बसमध्ये कॉलेज हून येणारे युवक युवती वयोवृद्ध जेष्ठ व्यक्ती, व शालेय मुळे यांचे गैरसोय होत आहे पालक लोकांनी शाळेला गेलेले मुली कधी येथील यांचे वाट बघत असतात शासनाने शालेय मुलांना शाळेत जाऊन पास दिले आहे मग बसची व्यवस्था कोण करणार यांची जॉब जिल्हा व्यवस्थापक आणि परिवहन मंत्री यांच्याकडे लेखी स्वरूपात करून आंदोलन छेडण्यात येईल

असलम मुल्ला
सामाजिक कार्यकर्ता किरणळी

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img