18.9 C
New York
Tuesday, September 17, 2024

Buy now

spot_img

कर्जबाजारीपणामुळे शेतकरी पुत्राची गळफास लावून आत्महत्या.

कर्जबाजारीपणामुळे शेतकरी पुत्राची गळफास लावून आत्महत्या.

बुलढाणा /राहुल साबळे

चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक येथील अल्पभूधारक शेतकरी उद्धव किसन चेके यांचा मुलगा गजानन वय वर्ष २८ याने दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी स्वतःच्या राहत्या घरात दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.सततची नापकी व वडीलावर असलेल्या कर्जाचा डोंगर तसेच घरात अठरा विश्वदारिद्र्य याला कंटाळून २८ वर्षीय गजानन उद्धव चेके या युवा शेतकरी पुत्राने आत्महत्या केल्याची घटना ११ऑगस्टच्या सायंकाळी ६ वाजता उघडकीस आली.घरातील हालाखीची परिस्थिती ३ एकर कोरडवाहू शेतामध्ये खराब पीक परिस्थिती व वडीलावर बँकेचे कर्ज या सर्व बाबीला कंटाळून आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष यांनी अंढेरा पोलिस स्टेशनला जाऊन फिर्याद दिली.घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यानी पोलीस कर्मचारी गणेश देडे,जगन महाराज नागरे,खार्डे साहेब यांनी घटनास्थळ धाव घेतली.घटनास्थळी येऊन पंचासमक्ष पंचानामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चिखली येथे मृतदेह पाठवण्यात आला,रात्री एक वाजेच्या दरम्यान त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले,पुढील तपास ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार गणेश देडे करीत आहे.

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img