आयपीएल इतिहासात ७००० धावा करणारा विराट कोहली पहिला फलंदाज ठरला. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत दुसऱ्या क्रमांकावर ६५३६ धावा करणारा शिखर धवन आहे. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर ( ६१८९), रोहित शर्मा ( ६०६३) आणि सुरेश रैना ( ५५२८) यांचा क्रमांक येतो.
विराटने आज दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १०००+ धावांचा टप्पा ओलांडला आणि दिल्लीविरुद्ध असा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरला. रोहित शर्मा ( ९७७), अजिंक्य रहाणे ( ७९२), रॉबिन उथप्पा ( ७४९) आणि सुरेश रैना ( ६६१) यांचा क्रमांक नंतर येतो.
विराटने यंदाच्या आयपीएलमध्ये ४००+ धावा केल्या आणि आयपीएलच्या ९ पर्वात त्याने ४००+ धावा करण्याचा एक वेगळा विक्रम नावावर केला. शिखऱ धवन व सुरेश रैना यांनीही असा पराक्रम केला आहे.
विराटचे हे आयपीएलमधील एकूण पन्नासावे अर्धशतक ठरले, अन् डेव्हिड वॉर्नरनंतर ( ५९) असा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरला. शिखऱ धवन ( ४९), रोहित शर्मा ( ४१) व एबी डिव्हिलियर्स ( ४०) हे त्यामागे येतात.
मुकेश कुमारने १६व्या षटकात विराट कोहलीची विकेट घेतली. किंग कोहली ४६ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ५५ धावांवर झेलबाद झाला.