25.9 C
New York
Saturday, June 22, 2024

Buy now

spot_img

विराट कोहलीने नोंदवले ४ मोठे विक्रम! हिटमॅन, गब्बरसह अनेकांना मागे टाकले

यपीएल इतिहासात ७००० धावा करणारा विराट कोहली पहिला फलंदाज ठरला. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत दुसऱ्या क्रमांकावर ६५३६ धावा करणारा शिखर धवन आहे. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर ( ६१८९), रोहित शर्मा ( ६०६३) आणि सुरेश रैना ( ५५२८) यांचा क्रमांक येतो.

विराटने आज दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १०००+ धावांचा टप्पा ओलांडला आणि दिल्लीविरुद्ध असा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरला. रोहित शर्मा ( ९७७), अजिंक्य रहाणे ( ७९२), रॉबिन उथप्पा ( ७४९) आणि सुरेश रैना ( ६६१) यांचा क्रमांक नंतर येतो.

विराटने यंदाच्या आयपीएलमध्ये ४००+ धावा केल्या आणि आयपीएलच्या ९ पर्वात त्याने ४००+ धावा करण्याचा एक वेगळा विक्रम नावावर केला. शिखऱ धवन व सुरेश रैना यांनीही असा पराक्रम केला आहे.

विराटचे हे आयपीएलमधील एकूण पन्नासावे अर्धशतक ठरले, अन् डेव्हिड वॉर्नरनंतर ( ५९) असा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरला. शिखऱ धवन ( ४९), रोहित शर्मा ( ४१) व एबी डिव्हिलियर्स ( ४०) हे त्यामागे येतात.

मुकेश कुमारने १६व्या षटकात विराट कोहलीची विकेट घेतली. किंग कोहली ४६ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ५५ धावांवर झेलबाद झाला.

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img