5.8 C
New York
Friday, April 26, 2024

Buy now

दैनंदिन जीवनातील ‘या’ 5 पेयांमुळे झपाट्याने वाढतोय Cancer चा धोका, वेळीच सावध व्हा!

जेव्हा शरीरात असामान्य पेशी वाढतात तेव्हा कर्करोगाच्या (Causes of Cancer) गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. कर्करोगावर उपचार करण्याच्या पद्धती हळूहळू विकसित होत आहेत.

तरीही जीवघेण्या आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीला त्रासदायक वेदनांना सामोरे जावे लागते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रोजच्या जीवनशैलीतील गडबड हे देखील कर्करोगाचे एक प्रमुख कारणांपैकी एक आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक सवयी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात. कर्करोगाच्या जोखमीपासून दूर राहण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचा वापर करणे अत्यंत फायदेशीर आणि आवश्यक मानले जाते. जर तुम्ही रोजच्या जीवनात हे पाच पेय पदार्थ घेत असाल तर वेळीच सावध व्हा. अन्यथा कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला सामोरे जावं लागेल. कर्करोग हा एक जीवघेणा आणि प्राणघातक आजार आहे. कर्करोगाचे अनेक प्रकार असून यामध्ये सर्वात घातक म्हणजे ब्रेस्ट, फुफ्फुस, कोलन, रेक्टम, प्रोस्टेट आणि ब्लड कॅन्सर सारखे आजार उद्भवू शकतात.

कर्करोगाची मुख्य कारणे कोणती?

डब्ल्यूएचओच्या मते, कर्करोगाची मुख्य कारण म्हणजे तंबाखूच्या सेवनामुळे, हाय बॉडी मास इंडेक्स म्हणजेच लठ्ठपणा, मद्यपान, फळे आणि भाज्यांचे कमी सेवन आणि शारीरिक हालचालींचा अभाव आहे. ही कर्करोगाची मुख्य कारणे ठरली आहेत.

अल्कोहोल

अल्कोहोल हे कर्करोगाचे मुख्य कारण आहे. जे लोक दररोज अधिक प्रमाणात मद्यपानाचे सेवन करतात त्यांना मान, यकृत, स्तन आणि कोलनमध्ये कर्करोगाचा धोका होऊ शकतो. एका दिवसात किती अल्कोहोलाचे सेवन करावे? तर CDC ने दिलेल्या सल्ला नुसार महिलांना दिवसातून एका दिवसात एक ड्रिंक आणि पुरुषांनी दोन ड्रिंकपेक्षा जास्त घेऊ नये.

बाटलीबंद पाणी

बाजारात मिळणारे बाटलीबंद पाणी हे देखील कर्करोगाचे कारण ठरू शकते. बाटलीमध्ये बिस्फेनॉल-ए किंवा बीपीए आढळून येत. जे कॅन्सरसाठी जबाबदार आहे. एका रिसर्चमधून समोर आले की, बीपीए एक हार्मोन अवरोधकच्या रुपात काम करतो. जे नंतर कर्करोगाचे कारण बनू शकते, बीपीए एक्सपोजरमुळे स्तनाचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग आणि चयापचय विकारांचा धोका निर्माण होऊ शकतो.

कॉफी

फार कमी लोक असतील त्यांना कॉफी हे पेय आवडत नसेल. कारण कॉफीच्या अति सेवनमुळे कर्करोगाचा अधिक वाढतो. अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्चने सल्ला दिला आहे की, जर तुम्हाला कॉफी प्यायची असेल तर विना क्रीम, साखर आणि चव नसलेली कॉफी पिऊ शकता. कारण साखर आणि क्रीममधील फॅटमुळे तुमचा लठ्ठपणा वाढतो आणि याने ब्लड शुगरही वाढते.

एनर्जी ड्रिंक्स

थकवा किंवा तहान लागली असेल तर अनेकजण एनर्जी ड्रिंक्सला पसंती दिली जाते. पण एनर्जी ड्रिंक्स आणि कॅन्सरमध्ये कोणताही थेट संबंध नाही. पण तज्ञ्जांचे मते, एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफिन आणि साखरेचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे लठ्ठपणा किंवा मधुमेह यांसारख्या कर्करोगाच्या अनेक समस्या वाढू शकतात.

सोडा

जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ मेडिसिनच्या अहवालानुसार, गडद रंगाच्या सोडामध्ये 4 मेल असते ज्यामुळे कर्करोग होतो. असे मानले जाते की, हे तत्व अनेक प्रकारच्या कर्करोगासाठी जबाबदार असतो. जर तुम्हाला कर्करोगापासून वाचायचं असेल तर तुम्ही सोड्याचे सेवन करु नका.

- Advertisement -spot_img

Related Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles