कळंब मध्ये वृत्तपत्रे आणि पत्रकारांच्या न्याय मागण्याबाबत धरणे आंदोलन..
कळंब: प्रतिनिधी, दै.यशसिद्धी न्यूज
माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पाहिले जाते. मात्र मध्यम करणीच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे आज दिनांक ११ मे २०२३ रोजी कळंब उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आज राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून खालील मागण्यात करण्यात आल्या आहेत.
१) पत्रकारासाठी स्वातंत्र्य कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्याला भरीव निधी द्यावा.
२) पत्रकारितेत ५ वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी.
३) वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागू असलेला जीएसटी रद्द करावा.
४) पत्रकारांच्या घरासाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा.
५) कोरोनात जीव गमावलेल्या पत्रकारांना फ्रंट लाईनचा वर्कर चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे.
६) शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक)यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिका इतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकाना त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात.
या मागण्यासाठी आम्ही आज आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे. आपण आमच्या या मागण्या आपल्या मार्फत शासनाच्या स्तरावर पाठवाव्यात आणि आम्हाला आणखी तीव्र आंदोलन करण्याचे पाऊल उचलावे लागू नये असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या धरणे आंदोलनास विविध राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संस्थांनी पाठिंबा दिला.यासाठी व्हाईस ऑफ मीडिया चे सर्व पदाधिकारी यांच्या सह कळंब शहर आणि तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.