22.6 C
New York
Friday, September 20, 2024

Buy now

spot_img

अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील तर उपसभापती पदी अप्पासाहेब पाटील यांची निवड

अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील तर उपसभापती पदी अप्पासाहेब पाटील यांची निवड

कारखाना असो वा दोनही बाजार समितीच्या विकासासाठी कटीबद्द : आ. सचिन कल्याणशेट्टी

अक्कलकोट ( विशेष प्रतिनिधी ): अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील तर उपसभापती पदी कृषीतज्ञ अप्पासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली आहे. निवड जाहीर होताच कार्येकर्त्यांनी एकच जल्लोष करीत गुलालचे उधळण करीत फटकाचे आतषबाजी केली.
दरम्यान सभापती पदाकरिता सिद्रामप्पा पाटील यांचा एकमेव अर्ज आला होता. तर उपसभापती पदाकरिता सत्ताधारी गटाचे अप्पासाहेब पाटील व बसवराज माशाळे तर विरोधी गटाचे कार्तिक पाटील या तिघांचे अर्ज आले. यामध्ये सत्ताधारी गटाचे बसवराज माशाळे हे व्यापारी मतदारसंघातून असल्याने या गटाला उपसभापती पदाकरिता निवडणूक लढविता येत नसल्याने सदरचा अर्ज अवैध ठरले. कार्तिक पाटील व अप्पासाहेब पाटील यांच्यामध्ये मतदान होवून यामध्ये अप्पासाहेब पाटील यांना 12 तर कार्तिक पाटील यांना 6 मते मिळाली. यामध्ये अप्पासाहेब पाटील यांचा विजय झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ए.जी.झालटे यांनी जाहीर केले. यावेळी सहा.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सिध्देश्वर कुंभार यांनी काम पाहिले.
सत्कारापूर्वी श्री स्वामी समर्थ व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
नूतन पदाधिकारी यांचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व उपसभापती अप्पासाहेब पाटील यांचा शाल, श्रीफळ, हार, गुच्छ देऊन सत्कार केले. याप्रसंगी स्वामी समर्थ सह.साखर कारखाना, अक्कलकोट व दुधनी बाजार समितीच्या नूतन संचालक सत्कार करण्यात आला.
सदरच्या निवडी होताच श्री बसवेश्वर मार्केट यार्डाच्या प्रशासन भवनातून मिरवणुकीने गोदाम येथे सभेत रुपांतर होवून त्या ठिकाणी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, अक्कलकोट व दुधनी बाजार समिती निवडणूकीची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात झाली. या निवडणुकीच्या माध्यमातून शेतकर्‍यांनी दिलेले उत्तर आहे. अप्पांच्या नेतृत्वाखाली सहकारात यापुढे देखील कार्यरत राहू. कारखाना असो वा दोनही बाजार समितीच्या विकासासाठी कटीबद्द असल्याचे सांगून झालेल्या निवडणुकी बाबत विश्लेषात्मक माहिती आ.कल्याणशेट्टी यांनी सांगितली.
माजी आमदार सिद्रामप्पा पाटील म्हणाले, 85 व्या वर्षी सभापती का झालो याबाबतची माहिती सांगून अक्कलकोट बाजार समिती, साखर कारखाना या अगोदर झालेल्या दुधनी बाजार समिती निवडणूकीबाबतची माहिती व जडणघडण सांगून विरोधकांचा खरपूस समाचार घेतले. यापुढील काळात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात अक्कलकोट व दुधनी बाजार समिती व कारखाना नावलौकिक मिळावे असे कार्य करु असे यावेळी पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी साखर कारखान्याचे नूतन अध्यक्ष संजीवकुमार पाटील यांनी झालेल्या निवडणुकीबाबतची माहिती देवून आगामी काळात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासोबत राहून काम करणार असल्याचे सांगून तीनही संस्था प्रगतीपथावर नेवू अशी ग्वाही दिली.
यावेळी महेश हिंडोळे व सोपान निकते यांनी कारखाना निवडणूकीबरोबर दोन्ही बाजार समिती निवडणुकीची माहिती राबविलेले उपक्रम याबाबत उत्कृष्ठ विवेचन केले.

सभापती पद दुसर्‍यांदा :
याअगोदार सहकारतपस्वी सिद्रामप्पा पाटील हे दि. 27 जानेवारी 1982 ते दि.26 जानेवारी 1987 या सालात अक्कलकोट बाजार समितीचे सभापती पद पाच वर्षे त्यांच्याकडेच होते. तब्बल 36 वर्षांनी पुनश्च सभापती पदाची संधी मिळाली आहे. 1987 चा काही काळ वगळता बाजार समितीवर सिद्रामप्पा पाटील यांची सत्ता होती व आजही ती कायम आहे.

85 वर्षाचे अप्पा आणि जिद्द :
आजही सिद्रामप्पा पाटील हे वयाची तमा न बाळगता तालुक्याच्या हितार्थ शेतकर्‍यांसाठी सतत धडपड सुरु असून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 50 वर्षे संचालक, 35 वर्षे जि.प.सदस्य, पंचायत समितीचे सभापती, जि.प.विषय समितीचे सभापती, आमदार, स्वामी समर्थ कारखाना गेल्या 25 वर्षापासून अबाधित वर्चस्व, तालुका खरेदी-विक्री संघ, सहकारी संस्थेवर वर्चस्व कायम.

पाटील घराण्याला तिसर्‍यांदा संधी
अक्कलकोट बाजार समितीवर सिद्रामप्पा पाटील यांना दुसर्‍यांदा तर त्यांचे सुपूत्र संजीवकुमार पाटील हे देखील बाजार समितीचे 2016 ते 2022 पर्यंत सभापती पदावर कार्यरत होते. वडिल आणि मुलगा यांचे अदलाबदल झालेले आहे. संजीवकुमार पाटील हे साखर कारखान्याचे चेअरमन पदाची धुरा हाती घेतली आहे. यापूर्वी दिलीपराव पाटील हे बाजार समितीचे संचालक म्हणून कार्यरत होते.

अप्पासाहेब पाटील यांना दुसर्‍यांदा संधी
यापुर्वी बाजार समिती 2017 ते 2022 पर्यंत उपसभापती पदावर कार्यरत होते. त्यावेळी सभापती हे संजीवकुमार पाटील हे होते. आता सिद्रामप्पा पाटील हे आहेत.

कार्याचे फलित
सिद्रामप्पा पाटील यांनी साखर कारखाना, बाजार समिती यावर अनेकांना कार्य करण्याची संधी दिली. अनेकांना विविध संस्थेवर पदे मिळवून दिली. चपळगाव भागात साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पद याबरोबर बाजार समितीचे पद देखील दिलेले असून शेतकर्‍यांकरिता जोमाने कार्य करण्याची संधी सिद्रामप्पा पाटील यांनी दिली आहे. हे माझ्या कार्याचे फलित आहे, शेतकर्‍यांचे आशिर्वाद आहे.
अप्पासाहेब पाटील, नूतन उपसभापती अक्कलकोट

बसवेश्वर मार्केट यार्डाचे उद्घाटन
यापूर्वी बाजार समिती ही जुन्या अडत बाजारात होती. सिद्रामप्पा पाटील यांच्या 1982 ते 1987 या काळात बागेहळ्ळी रोडवरील 33 एकर जागेत एकाच ठिकाणी व्यवसाय व प्रक्रिया युनिट मंजूरी मिळविणारे महाराष्ट्रातील त्याकाळात पहिली बाजार समिती ठरली होती. त्यावेळी 4 मे 1984 रोजी त्याकाळचे पाटबंधारे व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते.
या कार्यक्रमात आडत व्यापारी असोसिएशनचे नूतन अध्यक्ष बसवराज घिवारे, उपाध्यक्ष संतोष भंडारे, सचिव मुसा बागवान यांचा तसेच साखर कारखाना, दोनही बाजार समितीच्या नूतन संचालकांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी अक्कलकोट बाजार समितीचे नूतन संचालक करपे बाबूराव सिध्दप्पा, बाके कामगोंडा संगनबसप्पा, बिराजदार धनराज चंद्रकांत, बिराजदार शिवमंगल धोंडप्पा, स्वामी पार्वतीबाई इरय्या, कुंभार प्रकाश भिमराव, बंदीछोडे राजेंद्र धुळप्पा, घिवारे श्रीशैल स्वामीराव, माशाळे बसवराज शंकर व दुधनी बाजार समितीचे नूतन सभापती अप्पू परमशेट्टी, उपसभापती सिध्दाराम बाके, संचालक मोतीराम राठोड, विश्वनाथ इटेनवरू, सुवर्णा मचाले, अस्विनी सालेगाव, बहिदपाशा शेख, निगणा पुजारी, सिद्धाराम तोळणूरे, देवेंद्र बिराजदार आदीजण उपस्थित होते.
यावेळी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वनाथ भरमशेटटी, मल्लिकार्जुन कारले, रमेश कौटगी, भालचंद्र मोरे, संजय याबाजी, दिलीप शावरी, देवेंद्र बिराजदार, श्रीमंत कुंटोजी, निजामोद्दीन बिराजदार, सोपान निकते, उत्तम वाघमोडे, उमेश पाटील, महेश पाटील, संजय बाणेगाव, सुधीर मचाले, अभिजित पाटील, सुरेश झळकी, प्रकाश किलजे, चंद्रशेखर बडदाळे, प्रकाश हिप्परगी, विवेकानंद उंबरजे, धोंडप्पा पोमाजी, शिवपुत्र विजापुरे, सुभाष धुळखेडे, अमर रमेश पाटील, मल्लिनाथ पाटील, आदर्श पाटील, कांतु धनशेट्टी, पैगंदर नदाफ, दरेप्पा अरवत, कलप्पा हंगरगी, विवेक ईश्वरकट्टी, प्रभाकर दिंडूरे, शिवमूर्ती विजापुरे, रविंद्र बगले, विठ्ठल यमाजी, डॉ.शरणु काळे, पिरोजी शिंगाडे, मोहन दुलंगे, महेश पाटील, शरणु मसुती, अशोक वर्दे, सोमनाथ पाटील, शंकर उणदे, संतोष भंडारे, उमाकांत शटगार, संतोष माशाळे, गिरमल गंगोंडा यांच्याह साखर कारखाना संचालक, सोसायटी चेअरमन, संचालक, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक व सूत्रसंचलन आणि आभार मल्लिनाथ दुलंगे यांनी मानले.

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img