17.7 C
New York
Thursday, May 16, 2024

Buy now

शेतकरी व व्यापार्‍यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही : आमदार सचिन कल्याणशेट्टी

दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सातलिंगप्पा परमशेट्टी तर उपसभापती पदी सिध्दाराम बाके बिनविरोध

शेतकरी व व्यापार्‍यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही : आमदार सचिन कल्याणशेट्टी

अक्कलकोट दि.11 : (प्रतिनिधी) दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी व व्यापार्‍यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. शेतकर्‍यांसाठी शासकीय योजना दुधनी बाजार समितीमध्ये राबविल्या जातील. बाजार समितीवर भाजपाचा झेंडा फडकाविण्यासाठी जे कार्यकर्ते झटले. या कार्यकर्त्यांचा हा विजय असल्याचे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.

दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अप्पू उर्फ सातलिंगप्पा सैदप्पा परमशेट्टी तर उपसभापती पदी सिध्दाराम आण्णासाहेब बाके यांचा एकमेव अर्ज आल्याने अविरोध निवड करण्यात आली. सकाळी 11 वा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश नालवार यांच्या अध्यक्षतेखाली निवडीची प्रक्रिया संपन्न झाली.

आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपाने माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पॅनलचा दारुण पराभव केला होता.

सभापती व उपसभापतीची निवड गुरुवारी करण्यात आली. या निवडीनंतर सभापती व उपसभापती यांचा सत्कार करुन फटाक्यांची आतषबाजीने जल्लोष करण्यात आला.

या निवडीप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी, मुंबईचे आमदार अमित प्रतापसिंह, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, नूतन संचालक देवेंद्र सिद्राम बिराजदार, विश्वनाथ तुकप्पा नागुर, विश्वनाथ निंगप्पा कोगनुर, मल्लिकार्जुन मडोळप्पा झळकी, मोतीराम शिवू राठोड, सुवर्णा सुधीर मचाले, अश्विनी विजयकुमार सालेगाव, वहिदपाशा इब्राहिम शेख, निंगप्पा सिद्राम पुजारी, सिध्दाराम निलकंठ तोळणुरे, रमेश रेवणसिध्द पाटील, शिवानंद बाबुराव पाटील, ईरण्णा अंदप्पा दसाडे, सातलिंग शरणप्पा परमशेट्टी, चंद्रकांत श्रीमंतराव येगदी, बाबु गणपती कोळी, सचिव स्वामीनाथ स्थावरमठ या संचालकासह इतर मान्यवरांमध्ये अण्णप्पा बाराचारी, अप्पासाहेब पाटील, महेश हिंडोळे, भाजपा महिला ता.अध्यक्षा सुरेखा होळीकट्टी, भाजपा शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, मिलन कल्याणशेट्टी, विवेकानंद उंबरजे, सागर कल्याणशेट्टी, सुधीर मचाले, राजकुमार झिंगाडे, प्रकाश पाटील, मल्लिकार्जुन आळगी, सुर्यकांत माळगे, दयानंद बिडवे, चंद्रकांत दसले, नन्हु कोरबु, रजाक सय्यद, शिवशंकर स्वामी, कांतु धनशेट्टी, बाळासाहेब एकबोटे, राजु भरडे, कोंपा आदीजण उपस्थित होते.

यावेळी राजशेखर दोशी, शिवानंद हौदे, गिरमलप्पा सवळगी, रामचंद्र बिराजदार, शंकर भांजी, महेश पाटील, अतुल मेळकुंदे, बसवराज हौदे, सुभाष हौदे, शिवशरणप्पा हाबसी, जगन्नाथ जाधव, लक्ष्मीपुत्र पाटील, शाणप्पा दैनक, बसवराज परमशेट्टी, गोविंदप्पा परमशेट्टी, निर्मला गायकवाड, दौलत हौदे, मल्लिनाथ येगदी, भिमा अंदेनी, इरय्या पुराणिक, उमेश सावळसुर, काशिनाथ यरगल, रेणप्पा माशाळ, मल्लिनाथ टक्का, बाबा टक्कळकी, गुरुशांत बोळगोंडा, अर्जुन पुजारी, शांतलिंग वागदरी, शांतलिंग अंदेनी, लक्ष्मीपुत्र अंदेनी, मल्लिनाथ कामनळ्ळी, हणमंत कलशेट्टी यांच्यासह भाजपाचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

Related Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles