रेल्वे टी सी सोबत वाद ,होणार कॅमेऱ्यात कैद
पनवेल : प्रतिनीधी
मध्य रेल्वे विनातिकीट प्रवास करणार्यां नागरिकांवर होणार कठोर कारवाई रेल्वे प्रशासनाने राबवला अगळा-वेगळा उपक्रम
नोकरदार तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनातील अमूल्य घटक म्हणून रेल्वेची ओळख आहे. अनेकदा रेल्वे मधून प्रवास करतांना तिकीट तपासणी होत असते, यामुळे अनेक विनातिकीट प्रवास करणारे नागरिक तिकीट तपासणी अधिकाऱ्यांशी वाद घालतांना आपल्याला पाहण्यास मिळतात. अनेकदा गर्दुल्ले आणि माध्यपान करून प्रवास करणारे प्रवासी रेल्वे कर्मचाऱ्यांवर हल्ले देखील करत असतात . आता या सर्व प्रकारांवर आळा बसणार आहे. मध्य रेल्वे ने यासाठी एक अगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे. मध्य रेल्वेचे मुख्यालय मुबंई येथे तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या (TC) कोर्ट वर उजव्या बाजूस कॅमेरा बसवण्यात आला आहे. तिकिट तपासणी दरम्यान होणारा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओच्या माध्यमात कैद होणार आहे. यामुळे विनातिकीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर पुराव्या सहित कठोर कारवाही होणार आहे.
विनातिकीत प्रवास शिक्षा काय?
रेल्वे मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप वाढली आहे. अनेकदा प्रवासी सेकंड क्लास चे तिकीट काडून फस्ट क्लासमधून प्रवास करतात. रेल्वे कायद्यानुसार विनातिकीट प्रवास करणे गुन्हा आहे. लोकल रेल्वे मधून विनातिकीट प्रवासकेल्यास 260 रुपये दंड आहे. तसेच तिकीट तपासणी अधिकाऱ्यांशी वाद घातल्यास रेल्वे कायदा कलम 146 नुसार 6 महिने कारावास व 1000 रुपये दंड अशी शिक्षा आहे.