शिव-बसव डॉ बी. आर.आंबेडकर मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त 16 जोडप्यांचा विवाह संपन्न
अक्कलकोट ( प्रतिनिधी ): विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या
१३२व्या जयंतीनिमित्त शिव- बसव डाॅ.बी.आर.आंबेडकर मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मडिखांबे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाने सोळा जोडप्यांचा विवाह बौद्ध पद्धतीने लावण्यात आला,भारत हा देश विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असला तरी अजूनही भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतकरी आत्महत्या करत असतात त्यातील एक कारण म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या मुला-मुलींचे लग्न लावण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध नसतो त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत असतो,अशाच गोरगरीब व दुर्बल कुटुंबातील मुला मुलींचे संसार उभा करण्याचे काम शिव-बसव-डॉ. बी.आर.आंबेडकर मागासवर्गीय सामाजिक संस्था ही गेल्या सहा वर्षापासून करत असून संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत गेल्या सहा वर्षात ९१ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत , शिव-बसव- डॉ.बी.आर.आंबेडकर मागासवर्गीय सामाजिक संस्था विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय असे उपक्रम राबवत असून त्यातील एक प्रेरणादायी उपक्रम म्हणजे सामुदायिक विवाह सोहळा होय,या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये शिव-बसव- डॉ.बी.आर.आंबेडकर मागासवर्गीय सामाजिक संस्था यांच्याकडून ज्या जोडप्यांचा विवाह संपन्न झाला अशा जोडप्यांना पुष्पहार, गुच्छ, संसारोपयोगी भांडी, बेड, वधू-वराला विधीचा पांढरा पोशाख,वरांना सूट,बूट, वधुला शालु, सँडेल व तसेच मणी-मंगळसूत्र व पायातील जोडवे व तीन लाख रुपयांपर्यंत अपघात विमा , पहिली मुलगी झाल्यास तीन हजार रुपयाची ठेव , अशा विविध सोयी सुविधा पुरविण्यात आल्या त्या प्रमाणे सर्व वऱ्हाडी मंडळींना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती, व तसेच नवनियुक्त पोलीसांचा विशेष सत्कार करण्यात आला , यावेळी आगामी काळात संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातील असे आश्वासन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मडिखांबे यांनी दिले , हा विवाह सोहळा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले या विवाह सोहळ्यात भन्ते बी. सारीपुत्त, प.पु. गुरूलिंग महास्वामीजी हिरेमठ (बंगरगा मठ) , ख्रिश्चन धर्मगुरू Rev.राम अलमेलकर , राष्ट्रवादी नेते सुधीरजी खरटमल , मा. उपनगराध्यक्ष यशवंत तात्या धोंगडे, वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश मालक इंगळे , अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त अमोलराजे भोसले, भैय्यासाहेब खैरे पाटील , मा.नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, मा. नगराध्यक्ष महेशजी हिंडोळे , RPI (A) ता. अध्यक्ष अविनाश मडिखांबे , डॉ. सतिश बिराजदार , वकील ॲड. विजय हार्डिकर , ॲड. अनिल मंगरूळे , ( स्नेहलोक फाऊंडेशन प्रमुख ) काशिराया काका पाटील, वंचित बहुजन आघाडीचे ता. चंद्रशेखर मडिखांबे, मा.उपसभापती विलासजी गव्हाणे , राष्ट्रवादी ता.अध्यक्ष दिलीप सिध्दे , भाजप नेते मनोज कल्याणशेट्टी , कुरनूर सरपंच व्यंकट मोरे, प्रहार यु. जिल्हाध्यक्ष राजेश चव्हाण , रासप नेते सुनिल बंडगर, मा. मेजर शिवपुत्र घटकांबळे , नगरसेवक सद्दाम शेरीकर , युवा नेते महेश माने , भाजपा नेते नैनू कोरबू , मा.नगरसेवक नागेश कुंभार ,मा. नगरसेवक केरबा होटकर , विजयकुमार शिंदे (अडत व्यापारी सोलापूर) , संजय ( मामा) बनसोडे , पत्रकार कमलाकर सोनकांबळे , RPI नेते विजयकुमार पोतेनवरू, युवा नेते दत्ता कांबळे , (उपसरपंच चुंगी)महादेव माने , युवा उद्योजक परमेश्वर चव्हाण , सांगवी सरपंच बाळासाहेब भोसले , गणपतराव कलशेट्टी, व तसेच पत्रकार बांधव पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच हा विवाह सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विवाह सोहळा समिती अध्यक्ष विकास गायकवाड व सर्व पदाधिकारी , भिमप्रकाश मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिलामणी दादा बनसोडे व तसेच संत कक्कया महाराज युथ फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष उत्तम इंगळे व तसेच संस्थेचे मार्गदर्शक विनोद थोरे सर यांचे देखील विशेष सहकार्य लाभले हा विवाह सोहळा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी महादेव बनसोडे , हर्षवर्धन सोनकांबळे , मरेप्पा शिवशरण , सिद्धार्थ साळे , प्रणेश बनसोडे, महेश घटकांबळे, अजय मुकणार , विरुपाक्ष माने , दशरथ मडिखांबे ,शेखर कुंभार, संगय्या होळीकट्टी ,दिलीप कुंभार, उत्तम बनसोडे , महेश नडगम, गणेश बनसोडे , गौतम घाटगे , महादेव थोरे , प्रशांत मडिखांबे , बंटी नडगम , परशुराम भगळे , शेखर सोनकांबळे , शाहीर जैनजांगडे , शार्दुल रसनभैरे, दैवत थोरे , गंगाराम वाघमारे , राजू भगळे , यादव होटकर , मंजू नाईकनवरे, अमित दुपारगुडे ,राहुल भगळे , शाहिद दारूवाले , रहिम बिराजदार, राजरत्न थंब , संतोष सोनकांबळे, कृष्णा राजापूरे , समर्थ शिंदे , आदींसह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले