-4.3 C
New York
Sunday, February 25, 2024

Buy now

जनतेने विविध शासकीय योजने लाभ घ्यावे : संतोष कांबळे

वागदरी येथे शासन आपल्या दारी उपक्रम साजरा

जनतेने विविध शासकीय योजने लाभ घ्यावे : संतोष कांबळे

अक्कलकोट ( प्रतिनीधी ) मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. वागदरी ता अक्कलकोट येथे रविकिरण वरनाळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आले यावेळी प्रतिमा पूजन वागदरी सरपंच श्रीकांत भैरामडगी यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी बोलताना नायब तहसीलदार संतोष कांबळे म्हणाले की, शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत विविध शासनाच्या योजनाच्या माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शासनाचे काम चालू असून लोकांना घर बसल्या विविध दाखला, व योजनेचे माहिती देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला, समाजातील प्रत्येक घटकाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा सर्व नागरिकांनी जरूर लाभ घ्यावे असे आवाहन केले यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजय पाटील यांनी पंचायत समिती,जिल्हा परिषद आणि ग्रामपचायत स्तरावरील विविध योजना माहिती दिले व ग्रामपंचायत विविध दाखले ऑनलाईन कसे काढायचं यांची माहिती दिले व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबी योजना अंतर्गत मागासवर्गीय नवीन विहीर, एम आर इ जी एस अंतर्गत जनरल विहीर, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणारे विविध योजनांचे माहिती सांगितले

यावेळी नायब तहसीलदार श्री संतोष कांबळे, सरपंच श्रीकांत भैरामडगी,उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, पंचायत समिती विस्तार अधिकारी संजय पाटील, रमेश सावंत, पत्रकार चंद्रशेखर भांगे, कृषी मंडळ अधिकारी शिवानंद देगीले, प्रदीप पाटील , शिवराज (मंत्री ) पोमाजी,

सह कृषी अधिकारी शिरगापुरे, ग्रामसेवक विक्रम घाटे, राजू कणमुसे, मोहन ढोपरे, तलाठी सतीश जगताप , ग्रामपंचायत सदस्य शिवानंद घोळसगाव, सायाबु गायकवाड, श्रीकांत इंडे, महा ई सेवा केंद्र प्रमुख बसवराज कलशेट्टी, ग्रामपंचायत व
वीज वितरण कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

Related Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles