अक्कलकोट येथील ट्रामा सेंटर मधील अनाधीकृत भरती प्रक्रिया रद्द करण्याची रिपाईं व रासपची मागणी
अक्कलकोट (प्रतिनिधी) :- अक्कलकोट येथील ट्रामा सेंटर येथे स्टाफ,नर्स, ड्रायव्हर कर्मचारी वर्ग यांची महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनीच्या वतीने आर्थिक देवाणघेवाण करुन अवैध भरती करण्यात आली आहे. यामध्ये स्थानिकांचा विचार करण्यात आला नसल्याचे दिसून येत आहे.सदर भरती प्रक्रिया कोणत्याही प्रकारची लेखी अथवा तोंडी परीक्षा घेण्यात आली नाही. तरी नुकतेच भरती करण्यात आलेली प्रक्रिया रद्द करुन नव्याने जाहिरात प्रसिद्ध करुन लेखी परीक्षा व तोंडी परीक्षा घेउन सेवा भरती करण्यात यावे. तसेच राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जातीने लक्ष घालून भरती प्रक्रिया निश्पक्षपणे राबविण्यात यावे. कोरोना महामारीच्या वेळी तालुक्यातील अनेकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता कोवीड सेंटरमध्ये काम केले आहे त्यांना या ट्रामा सेंटर मध्ये प्राधान्य देण्यात यावे अन्यथा आमच्या पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपाईचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ट्रामा सेंटर मंजूर होऊनही सद्यस्थितीत चालू करण्यासाठी शासनदरबारी अनेकांनी पाठपुरावा करून देखील अद्याप ट्रामा सेंटर चालू झाले नाही आणि त्यात महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनीच्या वतीने आर्थिक देवाणघेवाण करुन आपापल्या मर्जीतील नातेवाईकांना भरती करण्यात आले आहे तरी सदर भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी केले आहे.