24 C
New York
Sunday, June 23, 2024

Buy now

spot_img

आंबेडकरवाद म्हणजे स्वयंप्रकाशाकडे घेऊन जाणारा वैज्ञानिक मार्ग होय : डॉ. सुरेश वाघमारे

आंबेडकरवाद म्हणजे माणसाला आत्मसन्मान व स्वयंप्रकाशाकडे घेऊन जाणारा वैज्ञानिक मार्ग होय : डॉ. सुरेश वाघमारे

वागदरी(एस.के.गायकवाड):
आंबेडकरवाद कुण्या धर्माशी,जातीशी निगडित नाही.तर आंबेडकरवाद हा मानव मुक्तीचा विचार असून समता,स्वातंत्र्य, बंधुता, व न्यायाच्या विचार म्हणजे आंबेडकरवाद होय आंबेडकरवाद हा गुलामी, सरंजामशाही, हुकूमशाही, धर्मांधशक्ती नाकारून माणसाला स्वाभिमान, आत्मसन्मान व स्वयंप्रकाशाकडे घेऊन जाणारा वैज्ञानिक मार्ग होय.असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ विचारवंत साहित्यिक प्रा.डॉ. सुरेश वाघमारे (लातूर)यांनी आष्टा (कासार) ता.लोहारा येथे बोलताना केले.
समिक्षा फाउंडेशन, लुंबिनी बुद्ध विहार ट्रस्ट,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय,बुद्धत्व सामाजिक बहुउद्देशिय संस्था व संबोधी महिला मंडळाच्या संयुक्त विद्यामाने दिवंगत तुकाराम गायकवाड यांच्या २४ व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील आष्टा (कासार) येते पहिले आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन डॉ. डी.टी.गायकवाड यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते.
या प्रसंगी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षिय स्थानावरून डॉ.सुरेश वाघमारे बोलत होते. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामविकासमंत्री तथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.आपल्या उदघाटनपर भाषणात बोलताना बसवराज पाटील म्हणाले की,आंबेडकरवादी साहित्य संमेलन हे समाजातल्या प्रत्येक घटकाला प्रेरणा देणारे असून आशा वैचारीक साहित्य संमेलनाचीव्याप्ती संबंध महाराष्ट्रभर होणे गरजेचे आहे.
प्रारंभी गावातील मुख्य रस्त्यावरून सर्वधर्म समभावाचे दर्शन घडविणारी ग्रंथदिंडी काढून, सामुदायिकरित्या बुद्ध वंदना घेऊन या साहित्य संमेलनास सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी आंबेडकरी
चळवळीतील विचारवंत कथाकार जेष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे (सोलापूर),जेष्ठ लेखीका सुरेखा शहा,व लोहरा येथील शीघ्र पत्रकार निलकंट कांबळे आदी मान्यवराना समिक्षा फाऊंडेशन पुणे(आष्टा कासार) यांच्या वतीने दिवंगत पिताश्री तुकाराम गायकवाड यांच्या २४ व्या स्मृती दिनाच्यानिमित्ताने दिला जाणारा जिवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच
विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप,सहशिक्षक आर.जी.गायकवाड यांचा सेवानिवृत्तीबदल सत्कार व डॉ. डी.टी.गायकवाड लिखित दोन पुस्तकांचे तर डॉ. म.ना.गायकवाड लिखित एका पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रा.डॉ. गौतम गायकवाड यांचे स्वागत अध्यक्षपर भाषण झाले.
तर दुपारच्या दुसऱ्या सत्रात प्रा.डी.डी.मस्के यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकरीवादी साहित्य संमेलनाची गरज आहे का ? या विषयावर परिसंवाद संपन्न झाला. या परिसंवादामध्ये डॉ.प्रा.किशोर थोरे,सामाजिक कार्यकर्ते मुकेश सोनकांबळे व प्रा.डी.डी.मस्के यांनी ग्रामीण भागात आंबेडकरवाद रूजविण्यासाठी प्रेरणादायी आंबेडकरवादी साहित्य संमेलनाची गरज आहे. आसा सुर आवळला.
या साहित्य संमेलनाचे प्रास्ताविक डॉ.डी.टी.गायकवाड यांनी केले तर सुत्रसंचलन भैरवनाथ कानडे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.डॉ. म.ना.गायकवाड यांनी केले.
यावेळी माजी जि.प.सदस्य दिलीप भालेराव,सरपंच सुलभाबाई कांबळे,परिवर्तन संस्थेचे सचिव मारुती बनसोडे, बार्टीचे प्रकल्पाधिकारी अंकुश गायकवाड, भिम छावा चे प्रदेश उपाध्यक्ष निलेश गायकवाड,प्रा.राजा सोनकांबळे, डॉ.इंद्रजित गायकवाड, संपादक कमलाकर सोनवणे,पत्रकार अरुण लोखंडे, एस.के.गायकवाड, चंद्रकांत शिंदे,आर.जी.गायकवाड, बाबुराव कांबळे, मुकेश सोमवंशी, दत्ता बलसुरे,राजेंद्र सोनवणे,कल्याणी कांबळे, लहु गायकवाड गुरुजी,बलभीम गायकवाड, डॉ.अंकुश गायकवाड,बाबासाहेब जाधव,केराबाई गायकवाड, सह ग्रामस्थ महिला, युवा कार्यकर्ते साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img