लोकशाही न्यूजचे चंद्रशेखर भांगे यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान
पुणे : विशेष प्रतिनीधी
किरनळी सुपुत्र आणि लोकशाहीचे पत्रकार चंद्रशेखर भांगे यांनी पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे 15 ऑगस्ट च्या निमित्ताने महाराष्ट्राचे माहामहीम राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते काल पुण्यात त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुणे शहर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि दैनिक पुढारीचे पत्रकार पांडुरंग सांडभोर, दैनिक महाराष्ट्र टाइम्स चे पत्रकार प्रशांत आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती. किरनळी सारख्या दुर्गम भागातून जाऊन पुण्यासारख्या मेट्रो शहरांमध्ये पत्रकारित सर्वोत्तम नाव कमवून सर्वसामान्यांना आपल्या बातम्यातून न्याय देणारे चंद्रशेखर भांगे यानी शहरात पत्रकारीतेत शिखर गाठल आहे.भांगे यांचा सन्मान झाल्याने सर्वासामन्य नागरीकांनी आनंद व्यक्त केला. चंद्रशेखर भांगे यांनी केलेल्या अनेक बातम्या विधीमंडळात तारांकित झाल्या आहेत .