-0.2 C
New York
Sunday, February 25, 2024

Buy now

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी चनप्पा कलशेट्टी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी चनप्पा कलशेट्टी

पुणे ( प्रतिनीधी ) गोगांव ता अक्कलकोट या सारख्या ग्रामीण भागातून जाऊन सामाजिक कार्य करत बहुजन समाजातील लोकांना न्याय देण्यासाठी सतत लढा देणाऱ्या चनप्पा कलशेट्टी यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी शहराध्यक्ष श्री.दिपकभाऊ मानकर, यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी कार्याध्यक्ष श्री.प्रदिपदादा देशमुख, सौ.प्रियाताई गदादे, युवकाध्यक्ष श्री.समीरदादा चांदेरे यांच्या हस्ते सर्व सेल अध्यक्ष, कार्याध्यक्ष, विधासभा प्रभाग अध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, संघटक सचिव नेमुन त्यांना पदनियुक्ती देण्यात आली.

समाजहितासाठी काम करा, आपला पक्ष हा प्रत्येक घटकापर्यंत पोचवा व त्याला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तसेच अजितदादा पवार यांच्या विचाराच्या व लोकहिताची कामे करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय दिला जाईल अशी ग्वाही शहराध्यक्ष दिपकभाऊ मानकर व प्रदीप देशमुख यांनी दिली.

यावेळी विधानसभा अध्यक्ष श्री संतोषभाऊ नांगरे, प्रदेश प्रतिनिधी श्री.शिवाजीभाऊ गदादे, विधानसभा कार्याध्यक्ष श्री.विपुल म्हैसुरकर, कार्याध्यक्ष श्री.रामदास गाडे, सेवादलाच्या अध्यक्षा सौ.शशिकलाताई कुंभार, सामाजिक सेल अध्यक्ष श्री.जयदेव इसवे, ओ.बी.सी सेल कार्याध्यक्ष श्री.रूपेश आखाडे
प्रभाग 28 अध्यक्ष राहुल गुंड करण गायकवाड आदि मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

Related Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles