19.6 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

spot_img

अक्कलकोट येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

अक्कलकोट येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर कंत्राटीकरण, खाजगीकरणाच्या विरोधात धरणे आंदोलन

अक्कलकोट (प्रतिनिधी)- राज्य सरकारने नवयुवकांचे आयुष्य उध्वस्त करणारा नोकऱ्यांमध्ये कंत्राटीकरण,खाजगीकरण करून तरुण पिढीला बरबाद करणारा शासन निर्णय रद्द करावा,, गोरगरीब आदिवासी मागासवर्गीय ओबीसी समाज चे मुलं ज्या शाळेमध्ये शिकतात ती शाळा खाजगीकरण करून धन दांडग्या लोकांच्या घशात घालून गोरगरिबांचे मुलं शाळा शिकवणे बंद करावा यासाठी सरकारने खाजगीकरणाचा निर्णय घेतला तो निर्णय बंद करावा रद्द करावा,, मुस्लिम समाज धनगर समाज व मराठा समाजाला आरक्षण मिळावा, जालना जिल्ह्यातील सावली या ठिकाणी वडार समाजाच्या मुलीवर पाचवी बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी,, सांगली जिल्ह्यातील बेडग या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कमान उभारण्यासाठी गेले तीन-चार महिन्यापासून समाजबांधव लॉंग मार्च मंत्रालयावर काढत असून त्याचा निर्णय लवकरात लवकर व्हावा,, केंद्र सरकारने अनेक सरकारी मालमत्ता खाजगीकरण करण्याचा सपाटा लावलेला आहे तो बंद करावा असे अनेक मागण्या घेऊन वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट तालुका व शहरच्या वतीने तालुका अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय धरणे आंदोलन करून तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांना निवेदन देण्यात आले
या निवेदनात जर वरील मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास जाहीर निषेध म्हणून अक्कलकोट बंद करण्याचा इशारा यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या तालुका अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांनी दिली या धरणे आंदोलनाला शिवसेना ठाकरे गट अक्कलकोट तालुकाप्रमुख आनंद बुक्कानूर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
हे धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष देवानंद अस्वले,, महिला आघाडी तालुका अध्यक्ष सारिका बनसोडे,,शहराध्यक्ष विशाल ठोंबरे महासचिव भारत देडे शहर महासचिव चनु शिंगे, युवक आघाडी शहराध्यक्ष संदीप बाळशंकर, तालुका महासचिव नागेश हरवाळकर नितीन शिवशरण गौतम गायकवाड तालुका उपाध्यक्ष नरसिंह गायकवाड , रमजान मुल्ला,तालुका संघटक आनंद मोरे, श्याम बनसोडे बबन गायकवाड सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे रवी पोटे योगेश सोनकांबळे आनंद सोनकांबळे प्रसिद्धी प्रमुख संदीप गजदाने तडवळ शाखा अध्यक्ष शरणाप्पा इब्रामपूर शाखा अध्यक्ष लालू बनसोडे वाघमारे, शाखा अध्यक्ष उमेश बनसोडे भुरीकवठे शाखा अध्यक्ष लक्ष्मीकांत बनसोडे मिरजगी शाखाध्यक्ष सिद्धाप्पा सोलापूरकर गेनू पाटील कर्जाळ चे विलास शिंदे, तालुका खजिनदार चन्नप्पा चिनवार, नूतन लहान सांगवी चे पोलीस पाटील जाधव युवक आघाडीचे तालुका उपाध्यक्ष संकेत शिरसे शहर सचिव संजय शिंदे, युवक शहर महासचिव रोहित साळे उस्मान भाई शेख, शिवा गायकवाड शहर उपाध्यक्ष शिवाजी चौगुले युवक आघाडीचे तालुका उपाध्यक्ष सुनील शिंगे, निमगावचे उत्तम , विश्वजीत भालेराव, भुरीकवठेचे दशरथ बनसोडे, तालुका उपाध्यक्ष महादेव थोरे , खानापूरचे साहेबांना बनसोडे, युवक शहर उपाध्यक्ष संतोष
घाडगे, तालुका उपाध्यक्ष संतोष बाळशंकर इत्यादी सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून धरणे आंदोलन यशस्वी करण्यात आले

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img