4.4 C
New York
Sunday, April 13, 2025

Buy now

spot_img
spot_img

स्वामी विवेकानंद पतसंस्थेस आदर्श पतसंस्था पुरस्कार प्रदान

स्वामी विवेकानंद पतसंस्थेस आदर्श पतसंस्था पुरस्कार प्रदान

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) :-
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात ज्या सहकारी पतसंस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रात अत्यंत उत्कृष्ट कार्य केले आहे अशा सहकारी पतसंस्थचे मुंबई येथील हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे दि.12 ऑक्टोबर रोजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या शुभहस्ते व माजी सहकार मंत्री.बाळासाहेब थोरात, खासदार सुनिल तटकरे, व्यवस्थापकीय संचालक निमिष माहेश्वरी आदि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संस्थेचे व्यवस्थापक चंद्रकांत दसले व सचिन पाटील यांना गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
मा.आमदार तथा चेअरमन सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्था स्थापनेपासून सभासदभिमुख कारभार करणाऱ्या स्वामी विवेकानंद पतसंस्थेने अल्पावधीतच संपूर्ण तालुक्यात बँकिंगची सोय करून आपला नावलौकिक मिळविला आहे. संस्थेचा संपूर्ण कारभार हा संगणीकृत असून सर्वच आर्थिक व्यवहारांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर केला जातो. प्रभावित कर्ज वसुली यंत्रणा राबवून ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. सामाजिक कार्य व व्यावसायिक भागीदारी संकल्पना,विनम्र व तत्पर सेवा. पतसंस्थेस सतत “अ” वर्ग प्राप्त असून संस्था सातत्याने नफ्यात असल्यामुळे सभासदांना दरवर्षी लाभांश देत आहे. व्यवसाय वृद्धी, सी.डी रेशो, कर्ज वसुली यांचे आदर्श प्रमाण संस्थेने राखले आहे. संस्थेची व्यवसायातील वाढ, ग्राहक सेवा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संचालक मंडळ, कर्मचारी व पिग्मी एजंट यांचे उत्कृष्ट सहकार्याने हे साध्य झाले आहे. आदर्श पतसंस्था पुरस्कार मिळाल्याबद्दल पतसंस्थेच्या सर्व पदाधिकारी संचालक व कर्मचारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याचे श्रेय सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक,ग्राहक, संचालक मंडळ कर्मचारी व पिग्मी एजंटाना जाते.
या प्रसंगी नवराष्ट्र ग्रुप चिफ एडिटर श्रीनिवास राव, सरव्यवस्थापक राजेश वरळेकर, सोलापुर चिफ एडीटर शेखर गोतसुर्वे, पत्रकार नंदकुमार जगदाळे, या मान्यवरासह मोठ्या प्रमाणात कृषी सहकार क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

- Advertisement -spot_img
spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img