18.4 C
New York
Tuesday, September 17, 2024

Buy now

spot_img

वागदरी येथील अपघातग्रस्त कुटूंबियांना आमदार कल्याणशेट्टी हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपये सुपुर्द

वागदरी येथील परमेश्वर यात्रेत अपघातग्रस्त कुटूंबियांना आमदार सचिन कल्याणशेट्टी हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपये सुपुर्द

अक्कलकोट ( प्रतिनीधी )
वागदरी येथिल ग्रामदैवत श्री परमेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त निघालेल्या रथोत्सवात रथाचा लोखंडी रॉड तुटून चाक निखळून झालेल्या अपघातात कै. गंगाराम तिप्पण्णा मंजुळकर व कै.इरप्पा गिरमल नंदे या दोन ग्रामस्थांचा मृत्यू झाला होता.या अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबास आधार मिळावा म्हणून आमदार श्री सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य मिळावे ही मागणी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली होती. त्यास अनुसरून मुख्यमंत्री महोदयांनी मृत पावलेल्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपये याप्रमाणे एकूण दोन लाख रुपये इतके अर्थसहाय्य विशेष बाब म्हणून मंजूर केले होते.आज त्या मदतनिधींचा चेक आमदार श्री सचिनदादा कल्यांणशेट्टी ह्याच्या हस्ते अपघातग्रस्त कुटूंबियांना सुपुर्द करण्यात आले.
यावेळी तहसीलदार श्री बाळासाहेब शिरसाट ,श्री श्रीशैल ठोंबरे, श्री प्रदीप जगताप ,श्री शाणप्पा मंगाणे ,श्री धोंडप्पा यमाजी, श्री बसवराज शेळके, सरपंच श्री श्रीकांत भैरामडगी, उपसरपंच लक्ष्मीबाई पोंमाजी,श्री कमलाकर सोनकांबळे उपसरपंच, श्री प्रकाश पोमाजी ,श्री संतोष पोमाजी,श्री सुनील सावंत,श्री बसवराज पाटील,श्री राजू मंगाणे,श्री शिवा घोळसगाव,श्री हनिफ मुल्ला ,श्री राजकुमार हुग्गे,श्री घाळय्या मठपती,श्री महादेव सोनकवडे ,श्री लक्ष्मण सोनकवडे, श्री उमेश पोमाजी ,श्री शांतप्पा कोठे,श्री कल्लाप्पा बिराजदार,श्री वीरभद्र पुरंत, व ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img