23.3 C
New York
Wednesday, July 24, 2024

Buy now

spot_img

अखेर राष्ट्रीय महामार्ग कडून रस्त्याच्या बाजूचे झाडे झुडपे काढण्यास सुरुवात

अखेर राष्ट्रीय महामार्ग कडून रस्त्याच्या बाजूचे झाडे झुडपे काढण्यास सुरुवात

दैनिक यश सिद्धी न्यूजचे घेतले वरिष्ठाकडून दखल

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट तालुक्यातील मौजे वागदरी ते भुरीकवट्या रस्ता दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झाडे वाढल्यामुळे कोपऱ्याच्या बाजूला वाढ झाल्यामुळे पुढे येणारे वाहन दिसत नव्हते

2 ऑक्टोंबर रोजी भुरीकवठे गावाजवळ कुंभार शेताजवळील कोपऱ्याला मोटरसायकल व फोर व्हीलर गाडीचे धडक होऊन किरनळी येथील बाळू कोळेकर या युवकांचा मृत्यू झाला याबाबत दैनिक यश सिध्दी न्यूज मध्ये सदर वृत्त प्रसिद्धी करण्यात आले होते व त्याठिकाणी भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रदीप जगताप व संघर्ष सामाजिक संघटनेचे उपाध्यक्ष महादेव सोनकवडे, अध्यक्ष श्याम बाबर यांनी सदर रस्त्याचे पाहणी करून याबाबत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या कडे झाडे काढण्याबाबत पाठ पुरावा केले होते व त्यानंतर दैनिक यश सिध्दी न्युज मध्ये बातमी प्रसिद्ध झाले होते यांचे दाखल घेत महामार्ग रस्त्या कडून त्वरित रस्त्याचे दोन्ही बाजूचे झाडे काढण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले याबद्दल वागदरी पंचक्रोशीतील लोकांनी दैनिक यश सिध्दी न्यूज व संघर्ष सामाजिक संस्थेचे अभिनंदन करीत आहेत
वागदरी येथे रुग्णवाहिका 108 गाडी वेळेत न आल्याने सदर अपघातात जखमी झालेले व्यक्ती बाळू कोळेकर याला जीव गमवावा लागला असेही बातमी प्रकाशन केले होते सदर या बातमीचे दखल घेत रुग्णवाहिका 108 गाडीचे जिल्हा समन्वयक काळे यांनी त्वरित वागदरी येथील 108 गाडीला वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन ठोंबरे यांना उपलब्ध करून दिले आहे सध्या या ठिकाणी नव्याने आलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन ठोंबरे यांनी काम पाहत आहे त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णाचे सोय झाले आहे 108 रुग्ण गाडीमुळे साप चावल्यामुळे व अपघातामुळे किंवा एमर्जेंसी तातडीचे रुग्णांना सोलापूर अक्कलकोट येथे पोहोचवण्याचे काम 108 रुग्णगाडी करत असतो परंतु सदर गाडी काही कारणास्तव आठ दहा दिवस वागदरी येथे बंद होते परंतु याबाबत दैनिक यश सिध्दी न्युजने आवाज उठवल्यानंतर त्वरित गाडी चालू करण्यात आले

संघर्ष सामाजिक संस्थेचे वतीने व शिरवळवाडी येथे झालेल्या अपघाताच्या वेळी संस्थेने स्वतः झाडे काढले आहे सामाजिक कार्यात सतत प्रयत्नशील असून अपघाताच्या ठिकाणी निस्वार्थ काम करत असतो

महादेव सोनकवडे
उपाध्यक्ष , संघर्ष सामाजिक संस्था

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img