हन्नूर च्या अनंत चैतन्य प्रशालेत ” नारी शक्तीचा” सन्मान
अक्कलकोट ( प्रतिनीधी )
सगळीकडे सुरू असलेल्या नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून ” आदीशक्ती चे स्वरूप असलेल्या , विविध अवतार धारण करून असूरशक्तीचा नायनाट केलेल्या अशा देवीच्या विभिन्न रूपात पाहिली जाणारी स्री केवळ स्री,महिला,नारी नसून ती मुलगी,पत्नी,आई,बहीण,अशा विविध भुमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडणारी ,एरवी हळूवार मनाची, माया -ममता, करुणा, दयेचा सागर असलेली नारी, प्रसंगी कठोर बनून ती कधी, दुर्गा तर कधी काली बनते,आजची नारी ही अबला नसून ती सबला आहे हे आज प्रत्येक पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किंबहूना त्याहूनही अधिक काम करून तिने सिद्ध केले आहे.आज असे एकही क्षेत्र नाही की जिथे स्री चा वावर नाही अशा या नारी शक्तीचा सन्मान करणे, तिचे संरक्षण करणे, तिला आणखी स्वावलंबी बनवणे गरजेचे असल्याने संस्थेच्या जेष्ठ संचालिका सौ. शांभवीताई कल्याणशेट्टी यांच्या संकल्पनेतून साकारलेले ” नारी देशाचा अभिमान- नारी शक्तीचा सन्मान ” या उपक्रमाच्या अनुषंगाने आज मंगळवार दिनांक १७ ऑक्टोबर रोजी महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, हन्नूर येथे “नारी शक्तीचा सन्मान” हा कार्यक्रम संस्थेच्या जेष्ठ मार्गदर्शिका सौ. स्वरुपाकाकू सिद्धप्पा कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पार पडला. प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. आदरणीय श्री. पंचप्पा कल्याणशेट्टी सरांच्या प्रतिमेचे पुजन सौ. स्वरुपाकाकू कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हन्नूर गावच्या प्रथम नागरिक सौ. सोनालीताई तळवार, ग्रामपंचायत सदस्या सौ. जयश्री भरमशेट्टी, सौ. मुक्ताबाई ढगे, सौ.गौराबाई भरमशेट्टी ,प्रशालेच्या जेष्ठ शिक्षिका सौ. मृदुलादेवी स्वामी,सौ.मल्लम्मा चप्पळगाव,सौ.स्वप्नाली जमदाडे,सेमी विभागाच्या शिक्षिका सौ.रुपाली सुरवसे,कु.लक्ष्मी तळवार ,सेविका श्रीमती नागिणी साठे उपस्थित होते.यानंतर सौ. स्वरुपाकाकू कल्याणशेट्टी यांचा शाल,पुष्पगुच्छ देऊन प्रशालेच्या प्रवेश, क्षेत्रभेट व सहलविभागाच्या प्रमुख सौ.मृदुलादेवी स्वामी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले तर सरपंच सौ. सोनालीताई तळवार यांचा सत्कार प्रशालेच्या शिष्यवृत्ती परीक्षा विभाग प्रमुख सौ. स्वप्नाली जमदाडे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.यानंतर उपस्थित सर्व ग्रामपंचायत महिला सदस्यां, माध्यमिक व सेमी विभागाच्या सर्व शिक्षिका,सेविका यांचा सन्मान गुलाब पुष्प देऊन सौ. स्वरुपाकाकू कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर प्रशालेचे पर्यवेक्षक श्री.अशोक साखरे सर यांनी “नवरात्र व माता पार्वती” याचे साधर्म्य व विविध रूपे याविषयी माहिती सांगून कार्यक्रमा मागचा हेतू स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मल्लम्मा चप्पळगाव मॅडम यांनी केले तर आभार सौ. स्वप्नाली जमदाडे मॅडम यांनी मानले. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम विभाग प्रमुख श्री.अप्पासाहेब काळे सर, जेष्ठ शिक्षक ज्ञानदेव शिंदे सर, छायाचित्र विभाग प्रमुख श्री.धनंजय जोजन सर, समस्त प्राध्यापक,शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.